आऊट डोअर खेळ आरोग्यासाठी उत्तम व्यायाम
आपण जेंव्हा लहान असतो तेंव्हा खूप खेळ खेळतो पण आजच्या सोशिअल मीडियाच्या जमान्यामध्ये हल्लीची लहान मुले आपल्याला बाहेर मैदानात कमी खेळताना दिसून येतात. आऊट डोअर खेळांमुळे आरोग्य चांगलं राहतं, फिटनेस वाढतो. भविष्यातील आजारपणं टाळता येतात, आपण उत्साही राहतो. कार्यक्षमता वाढते.. स्टॅमिना, ताकद वाढते असे भरपूर फायदे आहेत. खेळामुळे आपली इम्युनिटी सिस्टिम वाढते तसेच खेळामुळे उत्तम व्यायाम घडतो आणि नव्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठीची आपली क्षमताही खूपच वाढते. […]