नवीन लेखन...

 परमोच्य बिंदु

ऊर्जा शोषत असतां पाणी उकलन बिंदूवर येते पाण्याचे रुप बदलूनी बाष्प त्यांतून निघूं लागते   एक सिमा असे निसर्गाची स्थित्यंतर जेव्हां घडते एक स्थीति जावून पूर्ण दुजामध्ये ती मिळून जाते   तपोबलाची ऊर्जा देखील प्रभूमय ते सारे करिते परमबिंदूचा क्षण येतां साक्षात्कार तुम्हां घडविते   तुम्ही न राहता, तुम्ही त्या वेळीं ईश्वरमय  होऊन जाता सारे परि […]

कळलेच नाही !

एका अत्याचार झालेल्या स्री ने सांगितलेले दुःख काव्यात मांडण्याचा केलेला छोटा प्रयत्न […]

दर्पण

चित्र उमटते दर्पनात ते,  सुंदर असेल जसे तसे धूळ सांचता दर्पना वरी,  चित्र स्पष्ट ते दिसेल कसे   दर्पना परि निर्मळ मन,  बागडते सदैव आनंदी दुषितपणा येई त्याला,  भावविचारांनी कधी कधी   निर्मळ ठेवा मन आपले,  झटकून द्या लोभ अहंकार मनाच्या  त्या पवित्रपणाने,  जीवन होत असे साकार   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

भक्ती

माझी एक “मैत्रिणी” होती रांगेत माझ्यापुढे काही अंतरावर. एक माणूस कुणीतरी येऊन तिच्याशी काही बोलला आणी ती निघुन .गेली. अर्ध्या तासानं ती नामदेवाच्या पायरीकडून परत जाताना दिसली.. बहुधा संध्याकाळीचं तिच फ्री बुकिंग झालं होतं .तिचं. आणि दर्शनही. […]

निजामपूर-कुंभा धरण परिसर …. गूढरम्य सह्याद्री

निजामपूर हे माझ्या आजोळचं मूळ गाव असल्याने आणि मी तिथे कधीही न गेल्याने मनात कित्येक वर्ष ते रुंजी घालत होतं. सकाळचे दहा वाजले असताना निजामपूरच्या अगोदर रस्त्याच्या कडेला … शांत जागी एक साधं स्वच्छ हॉटेल दिसल्याने थांबलो. तिथून मागे सह्याद्रीच्या … ढगांनी वेढलेल्या डोंगररांगांचा विशाल देखावा दिसत होता. न्याहारी झाल्यावर मी हॉटेलच्या मालकांना विचारलं की हे डोंगर कुठचे … ते म्हणाले की तिथे कुंभा धरण आहे आणि त्या पलीकडच्याबाजूला आहे लवासा. […]

सुप्त चेतना

दिव्याची ज्योत पेटली,  वात दिसे जळताना जळेना परि वात ती,  दिव्यांत तेल असताना, जळत असते तेल,  देवूनी प्रकाश सारा आत्मबलीदानाचा दिसे, शोभून तेथे पसारा बागडे मूल आनंदी,  तिळा तिळाने वाढते आई-बापाच्या मायेनी, झाड कसे बहरते कष्ट त्याग हे जळती,  सुगंध आणिती जीवनी गर्भामधली ही चेतना,  जाणतील का कुणी ?   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

राब

केवळ भाताचे रोप असे आहे जे एका शेतातून काढून दुसऱ्या शेतात लावले की त्याला भरघोस पीक येतं. त्यामुळेच आपल्याकडे लग्न लावताना अक्षता म्हणून तांदळाचे दाणे डोक्यावर उडवले जातात. म्हणजे एका घरातील मुलगी दुसऱ्या घरात गेल्यानंतर ती ज्या घरात जाईल तिथे भरभराटी आणि समृद्धी येईल असे काहीसे शास्त्र आहे असे बोलले जाते. […]

बाव (विहीर)

आमच्या गावात विहीरीला बाव असे म्हणतात. कदाचित बावडी शब्दापासून बाव बोलले जात असावे. मी विहीरीवर जाऊन येतो असं बोलण्यापेक्षा मी बावीवर जाऊन येतो असे बोलले जाते. आमची बाव नेमकी कधी बांधली ते माहीत नाही पण बाबा सांगतात त्या प्रमाणे सुमारे 55 ते 60 वर्षांपूर्वी आमच्या आजोबांनी बावीच्या तळाशी असलेला कातळ सुरुंग स्फोटांनी उडवून खोली वाढवली आणि पक्कं बांधकाम करवून घेतलं होते. […]

वारी पंढरपुरी

विठ्ठल विठ्ठल । भक्तांची माऊली ।माय ती साऊली । पांडुरंग ।।१।। पांडुरंगा भेटी । भक्त करी वारी ।हाती झेंडा धरी । विठ्ठलाचा ।।२।। […]

1 4 5 6 7 8 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..