नवीन लेखन...

अनाहता, अनादि-अनंता

अनाहता, अनादि-अनंता, वाहिले तुज मी चित्ता , व्हावी तुझी मजवरी कृपा, हीच उरी आंस बाळगतां,–!!! शरण तुज आले रे दयाघना, तनमन मस्तक नमवितां, तुजकारणी देह पडावा, आठवते तुज कृपाकरा,–!!! तुज पायी वाहिल्या मी, अनेक अरे वेदना, काय सांगावे दुःख, किती भोगाव्या यातना,–!!! शरीर, मानस झिजवतां, नच मिळे सुख पण वंचना जावे कुठे सांगावे कोणा, देव मानती […]

चिमणीची निद्रा मोड

‘पहाट झाली, चिव चिवते चिमणी उमज येईना, उठविले तिजला कोणी…..१, आई आहे कां ? जी उठवी शाळेसाठी, गुदगुदल्या करूनी कुरवाळिते हळूंच पाठी….२, घड्याळ उठवी घण घण करूनी नाद घरट्यामधुनी, नाही ऐकला असा निनाद.’..३, ‘ उषाराणी  येते, साऱ्यांची आई बनूनी प्रेमानें मोडी झोंप, नाजूक करकमलांनी…..४, घड्याळ आमचे, दवबिंदू पडतां पानावरूनी चाळविती निद्रा, टपटप आवाज करूनी’ …..५ डॉ. […]

माहीत आहे

माहीत आहे, तू आभाळाएवढा, असीम अथांग अपार, तुझ्या कार्यकर्तृत्वाला, खरंच नाही सुमार,–!!! माहीत आहे, तू विस्तीर्ण सागरासारखा, प्रचंड उफाळत उसळत भरतीची वेळ येता, बेपर्वा बेलगाम बेदरकार,–!!! माहीत आहे, तू शांत झऱ्यासारखा, कलंदर, मितभाषी राहत आपल्याच धुंदीत राहणारा फक्त झुळुझुळू वाहत–!!! माहीत आहे, तू अजस्त्र ढगासारखा सगळीकडेच विचरत, संकटात कोणी असता, निरपेक्ष हात देत,–!!! माहीत आहे, तू […]

जगणें अटळ असतां

वाट कुणाची बघतो आम्हीं,   ठावूक असते ते सर्वांना मृत्यू हा तर अटळ असूनी,  केव्हांही येई अवचित क्षणा….१, आगमनाचा काळ तयाचा,   कल्पनेनें ठरविला जातो अचूक जरी ते शक्य नसले,   विचार त्यावरी करिता येतो…२, जीवन म्हणती त्या काळाला,   जगणे आले मृत्यू येई तो जगण्यापुढे पर्याय नसतां,   सुसह्य करण्या प्रयत्न होतो…३, तन मनाला सुख देवूनी,   जीवन काल वाढविती कांहीं […]

भावना उद्‍वेग

आकाशाला शब्द भिडले,  हृदयामधले भाव मनीचे चेतविता,  स्फोटक जे बनले देह जपतो हृदयाला,  सदा सर्व काळी धडकन त्या हृदयाची,  असे आगळी जमे भावना हलके तेथे,  एकवटूनी सुरंग लागता तीच येई,  उफाळूनी कंठ दाटता जीव गुदमरे आत रंग बदलती चेहऱ्यावरले, काही क्षणात उद्‌वेग बघूनी शरिर,  कंपीत होते हृदयातील भाव जावूनी,  मन हलके होते डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

मानवता आहे जगात

मानवता आहे जगात,-? प्रश्न खूपदा पडे, आई बापा टाकून देतात, कोणते पुण्य मग मिळे,–? संसारी रममाण होतात, भूतकाळाचा पडे विसर, उभे ज्यांनी केले ते, वृद्धाश्रमी सापडतात,–!!! हेच संस्कार मुलांवर, का बरे करतात,–? आईबापाला अंतर देऊन, कोणते समाधान मिळवतात,? वरील चित्रफितीतुनी, कोणता मिळे संदेश, वागणे प्राण्यांचे पहा, प्रेम केवढे हे विशेष,–!!! जिने त्यांना सांभाळले, माया ममता दाखवून, […]

दृष्टांताची किमया

निराकार तो असूनी व्यापतो,  सर्व विश्व मंडळ सूक्ष्मपणातही दिसून येतो,  करि जगाचा प्रतिपाळ….१ दर्शन देण्यास भक्त जणांना,  धारण करितो रूप तसाच दिसे नयनी तुमच्या,  ध्यास लागता खूप…२ दृष्टांत होणे सत्य घटना ती,  जीवनी तुमच्या घडे वेड लागता प्रभू चरणाचे,  सदैव स्वप्न पडे….३ कुणामध्येही अस्तित्व दाखवी,  हीच त्याची किमया परि टिपून घेई खऱ्या भक्ताची,  दृष्टांताची ही माया….४ […]

भूक न लागण्याची कारणे

भूक न लागणे किंवा जेवणाची इच्छा न होणे ही तक्रार अनेक वेळा केली जाते. भूक न लागण्यामागे काही आजारच असेल असेही नाही. दैनंदिन तणावामुळेदेखील एखाद्या वेळेस भूक लागत नाही. भूक न लागणे हा प्रकार बहुतेक सर्वांबरोबरच कधी ना कधी होतो. काही दिवसांसाठी असं होणं हे सामान्य आहे मात्र अनेक दिवस भूक लागत नसेल तर नक्कीच तो चिंतेचा विषय आहे. […]

मी गांधारी

आज पुन्हा चिडचिड झाली. मोबाईल जागेवर नव्हता. कारण शुल्लक होते. कळत होते. पण वळत नव्हते. हे हल्ली नेहमीचच झालय. बुद्धीने विचार करण्याच्या वेळी, भावनेच्या आहारी जातो. मग मूड जातो, मग डिप्रेशन येते, मग स्वतः ला दोष, पुन्हा चिडचिड! या वर मी एक उपाय शोधलाय. उपयुक्त आहे. असा मूड ऑफ झाला कि, मी माझे सारे पेंटिंगज् जमिनीवर […]

दयावंताला पाझर फुटला

दयावंताला पाझर फुटला , पक्षी पिंजऱ्यातून सोडला, विहंगम तो आनंदला, भरारी घेऊनी, उडाला,–!!! निळे आसमान ते, खुणावत सारखे होते, पिंजऱ्याच्या बंधनाला, मूक मन झुगारत होते,–!!! कोण येईल पुढे अन् स्वातंत्र्य देई मजला, देवाचा दूतच तो,– मज तेव्हा तो वाटला—!!! कोण आहे त्राता माझा, मज स्वातंत्र्य देणारा, वाट पाहतो जीव सारखा, उडायाला आसुसला,–!!! बोलावे मज हिरवी धरा, […]

1 9 10 11 12 13 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..