भक्ष्य
नदिकाठच्या कपारीमध्ये, बेडूक बसला दबा धरूनी उडणाऱ्या त्या माशी वरते, लक्ष सारे केंद्रीत करूनी…१, नजीक येवूनी त्या माशीचे, भक्ष त्याने करूनी टाकले परि दुर्दैव त्याचे बघा कसे, सर्पानेही त्यास पकडले…२, बेडूक गिळूनी सर्प चालला, हलके हलके वनामधूनी झेप मारूनी आकाशी नेले, घारीने त्याला चोचित धरूनी…३, ‘भक्ष्य बनने’ दुजा करिता, मृत्यूची ही चालते श्रृखंला जनक असता तोच […]