पुण्यनगरी काशी – भाग २
दरभंगा, गंगामहाल, सिंदीया, नेपाळ या घाटांची भव्यता व शिल्पकला डोळयात भरणारी. पुढे अहिल्याबाई होळकर, नागपूरकर भोसले, वैद्य अशा अनेक घाटांची मालिकाच आहे. प्रत्येकामागे इतिहास आहे. विष्णु, पार्वती, विनायक व अनेक देवतांची मंदिरे यांनी घाट सजलेला आहे. काशीचे घाट आणि रंगीबेरंगी छञ्या यांचे अतूट नाते आहे. छञ्यांच्या खाली पुरोहित व न्हावी आपली कर्मे मन लावून उरकत असतात. […]