नवीन लेखन...

समाधानी वृत्ती

कशांत दडले समाधान ते शोधत असतो सदैव आम्ही धडपड सारी व्यर्थ होऊनी प्रयत्न ठरती कुचकामी बाह्य जगातील वस्तू पासूनी देह मिळवितो सदैव सुख क्षणीकतेच्या गुणधर्माने निराशपणाचे राहते दुःख ‘समाधान’ ही वृत्ती असूनी सुख दुःखातही दिसून येती चित्त तुमचे जागृत असतां समाधान ते सदैव मिळते सावधतेने प्रसंग टिपता समाधान ते येईल हाती सुख दुःखाला दुर सारता अंतरभागी […]

पाठलाग एका स्वप्नाचा !

समोरच्या भिंतीवरचे घड्याळ रात्रीचे दोन वाजल्याचे दाखवत होते. कुठूनस एक वटवाघुळीच  पिल्लू, त्या बेडरूम मध्ये घुसलं होत आणि खोलीभर भिरभिरत होत. चारदोनदा भिंतीवर धडकून ते शेवटी झिरो बल्बवर विसावले. बहुदा बेडरूमची खिडकी उघडी राहिली असावी. त्याच्या पाठोपाठ अजून चार सहा वटवाघुळे त्या खोलीत आपल्या पंखाची फडफड करत घुसली. त्या सर्वांची डोळे पेटल्या निखाऱ्यासारखी लाल भडक होते. पंखांच्य फडफडीचा आवाज होतच राहिला, कारण लाल भडक डोळ्याची संख्या वाढत होती! खोलीतील उजेड त्यांच्या पंखानी अडल्यामुळे सर्वत्र गच्चं अंधार झाला होता. त्या काळ्या पंखानी त्या खोलीतला कण ना कण व्यापून टाकला. तरी पंखाच्या फडफडीचा आवाज कमी होत नव्हता.  […]

याला जीवन ऐसे नाव

काही काही वेदनांना सांत्वनाच्या शब्दांचा भारही पेलत नाही…. वपुंच्या या वाक्यात व्याकुळ करणाऱ्या संवेदनांची अनुभूती शब्दांकित झालेली दिसते. […]

काळजी

आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका … […]

मोदी है तो मुमकिन है !

आता खऱ्या अर्थाने काश्मीरचे भारतात विलनीकरण झाले असून काश्मीर ते कन्याकुमारी असं अखंड भारतीय संघराज्य अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वांकाक्षी निर्णयामुळे काश्मीरमध्ये विकासाची नवी पहाट उगवू शकेल ! तसेच गेल्या सात दशकापासून कुटील राजकारणाचं केवळ एक खेळणं बनून राहिलेला काश्मीर आता खऱ्या अर्थाने भारताचं नंदनवन बनू शकेल. गेली सात दशकं काश्मीरचा प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती कुणी दाखवू शकलं नाही, मात्र ‘मोदी है तो मुमकिन है !’ या घोषवाक्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटी करून दाखवलंय.. […]

भक्तीरसाने ओथंबलेली नवी गाणी (विनोदी लेख)

भक्तीरसाने ओथंबलेल्या या गाण्यांच्या भक्तीमय वातावरणात गणोशोत्सव साजरा करुन आपली महान संस्कृती जपण्यासाठी गणपती व इतर सणांच्या काळात विविध चित्रपटांची गाणी वाजवली जातात… त्याचा अनेकांना त्रास होतो….! खरं तर या गाण्यांचा भाव न समजल्यामुळे असा त्रास होतो… ही गाणी समजावी व आपला त्रास कमी व्हावा म्हणून हा छोटासा प्रयत्न…. […]

सरोवरी पाहिले मी

सरोवरी पाहिले मी, तुला अल्लद उतरताना, राजहंसी होऊन डुंबताना, देखणी जशी मासोळी, पाण्यात विहरताना, सुळकन् मारे उड्या, वरखाली हालताना, चपळ तुझ्या हालचाली , पाण्याचा वाटे हेवा, ठिकठिकाणी स्पर्श त्याला, रुबाब त्याचा पहावा, तुझी कमनीय तनू , जशी असावी हरणी, आनंदाने जणू हिंडते, इकडून तिकडे वनी, टपोरे मोठे डोळे,— पाणीदार काळे काळे, अगदी सरल नासिका, केशसंभार मोठे, […]

असे जगावे, तसे जगावे

असे जगावे, तसे जगावे, मला वाटते मुक्त जगावे, कधीही कुठले बंधन नसावे, ताणतणाव चिंता समस्या, अगदी त्यांना कोळून प्यावे,–!!! जीव टाकत स्वच्छंदाने, मुक्त विहरत मस्त रहावे, फुलपाखरू होऊन सगळे, जीवनाचे मर्म लुटावे,–!!! कधी कस्तुरी व्हावे वाटे, सुगंध फैलावण्या सारे, वाऱ्याने त्याचेच गान गावे, घेऊन जग तृप्त व्हावे,–!!! कधी वाटते डोंगरदरीत, हरणउड्या मारत हिंडावे, स्वैर आपुले आभाळचआपण, […]

फुलझाडाचे स्वातंत्र

उगवले होते जंगलात ते उंच माळावरी रंग आकषर्क फुलझाडांचे मन प्रसन्न करी || जरी होता उग्रवास तयाला मधूरता आगळी खेचित होते सौंदर्याने फुलपांखरे जवळी || वनराईचा पुष्कराज तो डोलत होता आनंदे ऐकत होता मान हलवूनी कोकिळेची पदें || वर्षा विपूल प्रकाश विपूल आणिक तो वारा स्वच्छंदाचे भाव उमटवित वाढवी स्वैर पसारा || कुणीतरी आला वाटसरु तो […]

पोटावरची चरबी वाढण्याची कारणे

लठ्ठपणाच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत. परंतु, काही लोकांची समस्या लठ्ठपणा नाही तर त्यांचं वाढलेलं पोट असतं. वाढलेल्या पोटामुळे तुमचा लूक तर खराब दिसतोच पण इतरही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढचं नाहीतर इतरही अनेक गंभीर आजार बळावण्याची शक्यता वाढते. […]

1 7 8 9 10 11 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..