शांत निद्रा
शांत अशा त्या मध्यरात्री, उंच पलंगी मऊ गादीवरी लोळत होतो कुशी बदलीत, निद्रेची मी प्रतीक्षा करी….१, निरोगी माझा देह असूनी, चिंता नव्हती मम चित्ताला अकारण ती तगमग वाटे, बघूनी दिशाहिन विचारमाला….२, प्रयत्न सारे निष्फळ जावूनी, निद्रा न येई माझे जवळी धूम्रपान ते करण्यासाठी, उठूनी सेवका हाक मारली….३, बऱ्याच हाका देवून झाल्या, परि न सेवक तेथे आला […]