लगन गंधार !
पुण्याहून येताना त्यादिवशी असंच वातावरण होतं. किंबहुना जास्तच . पुढचं काही दिसत नव्हतं . अशा परिस्थितीत गाडी थांबवण्याशिवाय पर्याय नव्हता . त्या अंधुक गूढ वातावरणात लगन गंधारचा बोर्ड दिसला आणि गाडी थांबवली . पळतच हॉटेलात घुसलो . त्या गारठ्यात गरम चहाची तल्लफ आली होती . पण ऑर्डरचे शब्द तोंडात येण्यापूर्वी कानात कुमार गंधर्वांच्या निर्गुणी भजनाचे स्वर घुमू लागले . […]