नवीन लेखन...

जनसेवा

आता दुनियेत| होती खूप हाल| सुकलेत गाल| शोषितांचे||१|| पाहिले अनेक|दु:खी जीव येथे| चित्त माझे तेथे|पांडूरंगा||२|| करतो मी पूजा|मनी तुझा ध्यान| नाही मला भान|देवा आता||३|| थोडी जनसेवा| हातून घडावी| साथ रे मिळावी| देवराया||४|| भाव पामराचा| समजून घ्यावा| आशिष असावा| देवा तुझा||५|| पुसू देत डोळे| भरवू दे घास| जगण्याची आस| वाढो त्यांची||६|| अनाथांचे हास्य| फ़ुलवेन आता| बनुनी त्यांचा […]

जखमांचे वण

किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती. एकच गोष्ट सतत कानी पडत होती. उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा. भडीमार होत होता आईकडून शब्दांचा.. आम्ही होतो बालपणीच गांधीवादी. एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे. मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे. खेळणें, कुदणें, उड्या मारणें, त्यातच […]

अजब न्याय नियतीचा – भाग ५

नील एक एक चित्र निरखून पाहू लागला. प्रत्येक चित्र पाहताना वाह, सुंदर, अप्रतिम, अमेझिंग, सॉलिड, क्या बात हैं असे म्हणत तो पुढे पुढे जात होता. नील चित्रं पाहत असताना चारुदी तिथेच उभी राहून त्याचे निरीक्षण करत होती. तो मनापासून चित्रांचे कौतुक करतोय हे पाहून तिच्या चेहेऱ्यावर समाधानाचे हसू झळकू लागले. […]

मी सिंहगड रस्ता बोलतोय !

पण खरं सांगू मी शिवपूर्व काळ पाहिलाय, शिवप्रभूंना पाहिलंय, तानाजी मालुसरे , बाजी पासलकर या शिलेदारांना पाहिलंय, टिळक सावरकर या क्रान्तिकारकांना पाहिलंय, तेंव्हा स्वतःच्या असण्याचा यथार्थ अभिमान बाळगलाय पण आता मात्र तुम्ही लोकं माझी करत असलेली दुर्दशा पाहून स्वतःचीच लाज वाटतीये……. […]

अजब न्याय नियतीचा – भाग ४

बोलत बोलत तो चारूदीच्या अगदी समोर जाऊन उभा राहिला आणि दीच्या नजरेला नजर मिळवत तो म्हणाला, ” खरं तर सुंदर आणि सुगंधी गुलाबाची फुलं आवडत नाहीत अशी कुणी सुंदर मुलगी, निदान माझ्यातरी पाहण्यात नाही. So, मी मनकवडा वगैरे काही नाही….. असच…. सहजच आणली. पण तुम्हाला मनापासून आवडली ना ही फुलं? मग झालं तर….” […]

समजेना मज उमजेना ! राहू कशी तुम्हाविना

(अरुणा साधू, मुंबई) – माझे यजमान “अरुण साधू” ह्यांना जाऊन दोन वर्ष होत आहेत. २५ सप्टेंबर ला ह्यांचा दुसरा स्मृतीदिन. दिवस,वर्ष सरतात, पण क्षणाक्षणाला त्यांची आठवण येते आणि माझे मन व्याकुळ होऊन जाते. ह्या व्याकुळतेतून सुचलेली ही कविता….. […]

सिद्दाबाबाची खोली

सिद्दाबाबाच्या खोलीत स्त्रियांनी का जायचे नाही, हे जाणून घ्यायला अलकाला फारशी चौकशी करावी लागली नाही. गोष्ट तशी फार जुनी नव्हती, तीस एक वर्षां पूर्वीची. आणि जे काही घडले ते प्रत्यक्ष पाहिलेले अनेक साक्षीदार हयात होते. […]

अजब न्याय नियतीचा – भाग ३

तोपर्यंत आरूला अंदाज आला होता की हा आता आपल्याला काय विचारणार आहे. पण ती एकदम गंभीर चेहेरा करून नीलला म्हणाली, “नील तू एक चांगला मुलगा आहेस, माझा जवळचा मित्र आहेस. आपण आपल्या आयुष्यातील खूप आनंदाचे क्षण एकमेकांसोबत शेअर केले आहेत. […]

सांगावा सखीचा

सांगावा सखे मिळाला जीव भेटीस आतुरला वाटे कधी पाहीन तुला निघालो बघ भेटायला तू गेलीस तिकडे अन जीव व्याकुळला इकडे जो भेटे तो मज विचारे असे काय झालं रे तुला दिवस जाई कसा बसा रात्र एकटी मोठी वाटे भकास आकाशात या चंद्र एक अकेला वाटे आसुसला जीव तुझा जाणीव मजला आहे निघालो तुज भेटाया अधीरता मनी […]

प्रभूची धांवपळ

चकीत झालो बघूनी,  प्रभूला दारावरी त्रिशूळ घेऊनी हातीं, आला होता जटाधारी क्षणीक थांबूनी दारावरती, गेला तो निघूनी बहूत वेळ येत राहिला, दार ना ओलांडले त्यांनी कळले नाहीं मजला, ही त्याची रीत विचार करीता मनी, जाणली मी ही गम्मत उपास तापास करुनी, देह शुद्ध केला भजन पूजन करुनी, तप मिळाले मजला गुंतले होते माझे मन, संसारातील मोहांत […]

1 5 6 7 8 9 20
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..