हे परमेश्वरा.. हे परमेश्वरा
(मुक्तछंदात्मक) थोडा वाकून पहा खाली, काय चाललंय या पृथ्वीतली, सत्ता, लत्ता, अधिकार, पैसा, यामधून एवढा माततो का कुणी,-? जनावरे बरी म्हणायची पाळी, संकेत, भाषा, सभ्यता, निष्ठा, कशी पाळतात ती सारी,–!!! समूहनियम, कर्तव्येही माहित, अधिकाराचे बडगे दाखवत नाहीत, नुसतीच माणुसकीचा आंव आणून,—- पैसा इतका प्रिय असावा की, म्हाताऱ्या आई-बापांनी जावे वृद्धाश्रमी, खस्ता जराही आठवत नाहीत, त्यांनी भोगलेल्या; […]