नवीन लेखन...

भालजी पेंढारकर

मराठी चित्रपट सृष्टीत ‘तांबड्या माती’तील साधा माणूस भालजी पेंढारकर यांचा जन्म २ मे १८९९ रोजी झाला. भालजी पेंढारकर कोल्हापूरच्याच गुरुवर्य विभूते यांच्या प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिकले. भालजी हुशार पण अभ्यासात लक्ष नसे. नाटकांचे वेड होतंच. मेळेही लिहित. परिणामी मॅट्रिक नापास झाले. आई रागावल्यावर हेही भडकून पुण्याला गेले. घरोघर सकाळी ‘केसरी’ टाकायचे. वयाच्या अठराव्या वर्षी सैन्यात दाखल झाले. […]

सव्वीस नोव्हेंबर

काळ रात्र ठरे ही सव्वीस नोव्हेंबर देश रक्षण्या वीर तो मरे//१// होता भ्याड हल्ला घुसले हो अतिरेकी नाहक या ताजवरी डल्ला//२// घे बळी नाहक क्षण हा कर्दनकाळ कुठे फेडती असे पातक//३// ठाकले सैनिक मावळे हे शुर वीर महाराष्ट्राचे हेच पाईक //४// दोन दिस झाले ओलीस ठेवती सारे परि नच सैनिक थकले//५// शहीद होऊनी शत्रूसी पाणी पाजले […]

या वळणावर

या वळणावर खुप हुंदडलो बहुत बागडलो मनमानी जगलो लाडाकोडात वाढलो *बालपण* या वळणावर थोडा शिस्तिचा बडगा झालो थोडा मी कोडगा अभ्यासाचा असे तगादा काय करू आता सांगा *कौमार्यपण* या वळणावर मौज मस्ती व्याख्या बदलली यौवनाची नशा चढली स्वतंत्रतेची बाधा जडली *तारुण्यपण* या वळणावर सारी नशा उतरली लग्नबेडी पायी आली संसारी खेळी चालली जबाबदारीने कंबरडे वाकली *प्रौढपण* […]

दिवेलागण

ही सायंकाळ ती खग माळ उंच उडते सांज सकाळ पश्चिम वात उधळी रात हा सुखावतो मनामनात येता घरात ही तेलवात दिवेलागण या देव्हाऱ्यात दिवा लावला तम सरला शुभंकरोती नाद घुमला वृंदावनाशी दिप लावशी नित्य घरात लक्ष्मी वसशी — सौ.माणिक शुरजोशी नाशिक

लोकशाही जिवंत आहे का?

गेल्या सात दशकापासून लोकशाहीचा हा प्रयोग अव्याहतपणे सुरू असतांना राजकीय पक्षांनी तदवतच ज्यांच्यावर घटनेच्या मूल्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे, त्यांनी घटनेशी खरंच इमान राखले आहे का? यावर स्वतःला लोकशाहीवादी म्हणविणाऱ्या प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची वेळ आज आली आहे. […]

बासरी वादक, संगीतकार, नृत्य निर्देशक, कवि व लेखक पंडित विजय राघव राव

बासरी वादक, संगीतकार, नृत्य निर्देशक, कवि व लेखक पंडित विजय राघव राव यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९२५ रोजी मद्रास येथे झाला. पंडित राघव राव सहा दशकाहून संगीत बरोबर जोडलेले होते. त्यांनी भरतनाट्यममध्ये मध्ये सुद्धा प्रशिक्षण घेतले होते. आकाशवाणी दिल्ली चे कलाकार होते. पंडित रविशंकर यांना त्यांनी गुरु मानले होते. पंडित विजय राघव राव हे फिल्म डिव्हिजनचे मुख्य […]

ग्रीष्माचे दोन रंग

वास्तविक वर्षभर गुमान गप असणारा गुलमोहर उन्हाळ्यात राजासारखा तेजपुंज  दिसू लागतो. गुलमोहराची  विशेष अपेक्षाही नसते. त्याची वेगळी निगा राखावी लागत नाही.तो कुठेही तग धरतो.मग तो  शेताचा बांध असो, नाहीतर शाळेचे पटांगण असो ,रस्त्याच्या बाजूला असो, किंवा एखाद्या बंगल्याचे आवर असो.उन्हाळ्याच्या रखरखीत पणात काही मोजकी झाडे ज्या दिमाखात वावरतात त्यात एक गुलमोहर. […]

ती अभागी…!

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रात शाळेतील क ख ग तर तिच्या ओठीही नाही…! पुढाऱ्यांच्या बॅनर वरच्या मोठमोठ्या निर्जीव माणसांकडे पाहात पाहात, नशिबाचं गाणं गात गात ती गर्दीत कुठे आणि कधी हरवून जाते माहीत नाही…! […]

बाबाजी, उल्लूचें

तर साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे, आमच्या ऑफिसमधला संपतराव नऊ महिन्याची पोटुशी बायको (स्वतःची) घेऊन दवाखान्यात जाताना मला भेटला. संपत खरंतर देव माणूस, तीन पोरींचा बाप, तुटपुंज्या पगारात पण अगदी सदानंदी. पण घरच्यांच्या  ‘पोराच्या’ नादापायी हे दवाखान्याचे खेटे घालतोय. मला त्याची कीव आली. मी  अगदी चालत चालत सहज बोललॊ “संपतराव, ह्या वेळी नक्की पुत्रप्राप्ती आहे. बिनघोर राहा”. हे ऐकून संपतराव आणि परिवार जाम खुश झाले  आणि माझ्या हातात पेढा देण्याचा तेवढ बाकी ठेवून छान हसले. […]

भारताची सागरी सुरक्षा : सद्य परिस्थिती आणि उपाय योजना

26 नोव्हेंबर 2019 ला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला अकरा वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेचे अवलोकन केले पाहिजे. गेल्या पाच वर्षात सागरी सुरक्षेमध्ये काय सुधारणा झाल्या, सध्याची परिस्थिती कशी आहे आणि येणाऱ्या काळात अजून काय जास्त सुधारणा करणे गरजेचे आहे या सगळ्या विषयावर चर्चा होणे जरुरी आहे. […]

1 2 3 4 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..