MENU
नवीन लेखन...

बॉलिवूडमध्ये ८० चे दशक गाजवणारी अभिनेत्री पद्मीनी कोल्हापुरे

पद्मिनी कोल्हापूरे… हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री. ‘प्रेम रोग’,’आहिस्ता आहिस्ता’,’वो सात दिन’,’विधाता’ अशा विविध सिनेमातील भूमिकांनी पद्मिनी कोल्हापूरे यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यांच्या चेह-यावरील निरागसपणा, आकर्षक आणि घायाळ करणारं सौंदर्य यामुळे ८०च्या दशकात पद्मिनी कोल्हापूरे यांची वेगळीच जादू होती. […]

कवी अरुण बालकृष्ण कोलटकर

१९७४ साली त्यांनी लिहिलेल्या ‘ जेजुरी ‘ या इंग्रजी काव्य संग्रहाला राष्ट्रकूल पारितोषीक मिळाले , आणि अरुण कोलटकर हे नांव थेट जागतीक पातळीवर पोहोचले. अन पुढे ते भारतीय इंग्रजी कवी म्हणून प्रसिद्ध पावले. […]

टीम इंडियाचा माजी खेळाडू व्ही.व्ही.एस लक्ष्मण

क्रिकेट जगतात एक वेळ अशी होती की या व्हेरी व्हेरी स्पेशल फलंदाजाला ऑस्ट्रेलिया संघ घाबरत होता. लक्ष्मणने आपल्या करिअरमध्ये सर्वात अधिक धावा ऑस्ट्रेलियाविरूद्ध २,४३४ इतक्या धावा काढल्या आहेत. त्याने कसोटीत कंगारू विरूद्ध ६ शतके तर १२ अर्धशतके ठोकले आहेत. […]

संगीतकार, संयोजक, वादक अरुण पौडवाल

एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मराठी-हिंदी सिनेजगतात आपली छाप सोडणारे संगीतकार अनिल-अरुण अर्थात अनिल मोहिले व अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेल्या बहारदार गीतांचे गारूड आजही रसिकांच्या मनावर आहे. मराठीतले शंकर-जयकिशन अशी ओळख असणाऱ्या या संगीतकार जोडीची कारकीर्द विलक्षण गाजली. […]

ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर

शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. नाटकाप्रमाणे चित्रपटातदेखील शरद तळवलकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, तुळस तुझ्या अंगणी, रंगल्या रात्री अशा अखेर जमलं, वाट चुकलेले नवरे, बायको माहेरी जाते, मुंबईचा जावई आणि एकटी अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. […]

ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव

केवळ गीतकार आणि संगीतकार एवढेच ‘शब्दप्रधान गायकी’चे पुरस्कर्ते यशवंत देवांचे कर्तृत्व नाही. ते उत्तम संगीत शिक्षक व संगीत संयोजक होते, काव्याचे डोळस अभ्यासक होते. चित्रपटांप्रमाणेच नाट्यक्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षणीय आहे. चाळीसहून अधिक नाटकांसाठी त्यांनी गीत, संगीत, पार्श्वसंगीत देण्याची जबाबदारी सांभाळली आहे. […]

सुप्रसिद्ध लेखिका योगिनी जोगळेकर

गायिका, कवयित्री, नाटककार व सुप्रसिद्ध लेखिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म ६ ऑगस्ट १९२५ रोजी पुणे येथे झाला. योगिनी जोगळेकर यांनी बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर १९४८ ते १९५३ या काळात त्यांनी शिक्षिका म्हणून नोकरी केली. तसेच ‘राष्ट्रसेविका समिती’च्या माध्यामातून त्यांनी अनेक वर्ष सामाजिक कार्यही केले. याच काळात त्यांनी विविध कथा, कादंबरीतून स्त्रीविषयक लेखन केले. त्यांचे काही काव्यसंग्रह व […]

राष्ट्रीय कीर्तन केसरी गोविंदस्वामी आफळे

बुवांच्या कीर्तनाला हजारोंनी गर्दी होई, रस्ते बंद होत. भावगीतांच्या काही रेकॉर्डसही त्यांच्या आवाजात निघाल्या. “सागरा प्राण तळमळला” हे सावरकर रचित गीत सर्वप्रथम HMV ने १९४८-४९ साली त्यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित केलेले आहे. विविध मासिकात, दैनिकात त्यांचे वेगवेगळ्या विषयांवर लेख प्रसिद्ध होत. १५ नाटके, २ कवितासंग्रह, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनकार्यावर आधारित “सावरकर गाथा” हे महाकाव्य त्यांनी रचले. त्याचे काव्यगायनाचे १०० प्रयोगही त्यांनी केले. संपूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेरची असंख्य गावं इतकच नव्हे तर अमेरिकेतही ते ३ महिने राहून कीर्तने गाजवून आले. […]

वर्ल्ड व्हेगन डे

दरवर्षी १ नोव्हेंबरला संपूर्ण जगभरामध्ये World Vegan Day साजरा करण्यात येतो. व्हेगन डायट म्हणजे प्राणिजन्य अन्नपदार्थांचा संपूर्ण त्याग. ही आहारशैली पाळणारे लोक दूध, तूप, अंडी हे पदार्थ देखील खाण्यास वर्ज्य मानतात. हे पदार्थ मिळवताना हिंसा होते असा त्यांचा सिद्धांत आहे. […]

ज्येष्ठ दिग्दर्शक रामचंद्र ठाकुर

रामचंद्र हे ठाकूर हिंदी आणि गुजराती चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक होते. रामचंद्र ठाकूर यांची खासियत ही होती की ते अकरा भाषा बोलणारे बहुभाषी होते. ते पाली भाषेचे अभ्यासक होते. […]

1 19 20 21 22 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..