नवीन लेखन...

डायरी (कथा)

कोकणातल्या रत्नगिरी जिल्ह्यतील या एका छोट्या खेडेगावातील या घरात राहायला येउन तिला आज दहा दिवस झाले होते.मधुराचा नवरा  शरद एका सरकारी बँकेत नोकरीला होता. काही दिवसापूर्वी त्याची बदली या गावात झाली होती. बँकेच्या एका खातेदाराच्या ओळखीने त्याला खूप कमी भाड्यात हे घर मिळाले होते. घर शहरापासून दूर व तसे एकाकी होते पण होते मोठे मजबूत अगदी चिरेबंदी वाड्यासारखे. […]

स्वतःशीच बोलू काही

काय केले म्हणजे सकारात्मकता वाढीस लागेल,ह्यावर माझाच मी माझ्याशी मुक्त संवाद साधला.
खरच सांगते ,मनानी मनाशी;स्वत:स्वतःशी साधलेला आजचा संवाद मला सुखाच्या हिंदोळ्यावर झुलवतोय. […]

सुख दु:खाचे चक्र

कळप   सतत फिरे चक्र निसर्गाचे सुख दु:खाचे…१, एका मागूनी दुसरा असती पाठोपाठ येती…२, प्रत्येक वस्तूची छाया असते पाठलाग करिते….३, सुखाचे जाता काही क्षण आनंदी समाधानाची होई गर्दी….४ लगेच अनूभव येतो दु:खाचा काळ जाई निराशेचा…५, पूनरपी येता सारे सुख विसरूनी जातो दु:ख….६, जे होत असते ते बऱ्यासाठी म्हणती समाधाना पोटी…७, समाधान शोधणे हेही सुख त्यातच  जगती […]

खरच सांगते (हास्य कविता)

मला एकदातरी मंत्री करा हो खरच सांगते आश्वासनांच टॉनिक पाजून प्रजा सारी निरोगी करते मला एकदा तरी शिक्षणमंत्री करा हो एक एक अकरा म्हणून गणित साऱ्यांचं पक्क करते. मला एकदा अर्थमंत्री करा हो खरच सांगते कर्जाचा डोंगर उभा करून पुढील येणाऱ्या सरकारला फेडायला सांगते मला एकदा गृहमंत्री कराच हो खरं सांगते घरगुती भांडण चव्हाट्यावर मांडून केलेली […]

माणसात भेटला

दगडात देव, माणसात भेटला नाशवंत देह, आत्मा कुणी पाहिला —(!) सत्कर्म जगतचं राहते तस्विरी टांगल्या भिंतीवर नर्क काय अन स्वर्ग काय? ठायी माणूस भूलोकी आस वैकुंठाची गिनती कशाला पाप पुण्याची आयुष्य पुरे कर्माचे भोग भोगायला दोर तुटता आयुष्याची तडपला आत्मा, देहा वाचुनी दगडात देव, माणसात भेटला आत्मा अमर, देह मातीत मिसळला —(!!) वारीत शोधती हरी सावळ्या […]

द्रोण काव्य

ह्या सप्त रंगातल्या इंद्रधनुष्याच्या कमानीखाली मेघराजा गालात हसा ना — सौ.माणिक शुरजोशी

गोष्ट प्रेमाची…..।

चेहेरा तर खूप सुंदर भेटणं, नक्कीच माझ्यापेक्षा ही … पण जेव्हा गोष्ट प्रेमाची येईन ना तेव्हा कदाचित जाणीव नक्कि होईन तुला माझी….माझ्या प्रेमाची…..!!! — मयुरी राम विखे

मुक्त छंद – पिपळपान

तुझं-माझं आयुष्य आहे एक पिंपळपान वार्धक्याच्या उंबरठ्यावर शरीर झाले जाळीदार…. भुतकाळात शिरलो की आपण दोघे क्षणार्धात याच पिंपळ वृक्षाखाली बसलो होतो तासनतास…. तारुण्यातली रग होती जगण्यातली धुंदी मोठी सुखी संसाराच्या सारीपाटावर पडली दानं खोटी होती. पानगळीच्या ऋतूत पानगळ झाली जवळ तेवढी फांद्यांची जाळी तेवढी शिल्लक राहिली वहीतलं पिंपळपान तुझं नी माझं गीत गात हलकेच पण जाळीतून […]

मनी प्रेम कर

तारूण्याच्या उंबरठ्यावरी,   ज्योत प्रेमाची पेटून जाते बाह्यांगाचे आकर्षण परि,   वयांत त्या भूरळ घालते…१, प्रेमामधली काव्य कल्पना,  शरिर सुखाच्या नजीक ती किंचित होतां देह दुर्बल त्याच प्रेमाची घृणा वाटती…२, प्रेम हवे तर प्रेम कर तूं,  मूळे असावी अंतर्यामी मना मधली ओढ खरी ती,  येईल अखेर तीच कामीं…३, अंतर्मनातील प्रेम बंधन,  नाते त्याचे अतूट असते देहामध्यें बदल घडूनही, […]

तुझा स्पर्श

सप्त शृंगी गडासी वणीची देवी धावत येते गाईन तुझी ओवी पायरी पायरीस हा तुझा स्पर्श मना मोहवी मनी दाटतो हर्ष बोलले मी नवस साडी चोळीचा आले फेडण्या नित्य ध्यास वणीचा रुप सुंदर तुझे हे मोहविते भक्तासाठीच गडा वस्ती करिते लोळण घेतले मी तुझ्या पायाशी आसुसले मी गं वर मिळण्याशी महती गाईन मी आई अंबाई वणी वासिनी […]

1 5 6 7 8 9 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..