नवीन लेखन...

हवेत हा गारवा

वाढता हवेत हा गारवा बाजारी चिंच,बोरे,आवळा ऊस नी हिरवा हरबरा खाण्या हा जीव होई बावळा सांजवात होताच शेकोटी पेटवू उब मिळविण्यास फड रंगे गप्पांचा भोवती चहा रिचवावा हाच ध्यास पहाटे चला जाऊ शेतात भरित मेजवानी जोमात जोडीला हुरडा असावाच हवेत हा गारवा झोकात — सौ. माणिक (रुबी)

मला जगायचंय तुझ्यासाठी

गेलास ना परदेशी लेकरा भेट आता आपली होईल का? दिर्घ आजाराने देह पिडीत या त्रास मला रे सोसवेल का? जिव गुंतला माझा तुमच्यात आशा जागते इथे काळजात या झडकरी तुम्ही भारतात हितगुज साधुया आपसात तुझ्या वडीलांनी गाठली साठी लहान बहिण आहे रे पाठी जीव तळमळतो भेटीसाठी मला जगायचंय तुझ्यासाठी — सौ. माणिक (रुबी)

चक्रव्यूह

ज्या प्रमाणे एखादं चक्रीवादळ किंवा त्सुनामी आपल्या बरोबर सगळ्यांना विनाशाकडे घेऊन जाते;तद्वतच आजची पिढी व्यसन नावाच्या चक्रीवादळात पार गुरफटलेली दिसून येते.आजची युवा पिढी स्वत:च स्वत:ला मृत्यूच्या दाढेत ढकलतांना दिसत आहे. […]

सर्व जीवांना जगूं द्या

जाळी जळमटे वाढूं लागली, घरा भोवती  । किडे नि मुंग्या झुरळे,  यांची रेलचेल होती  ।। चिवचिव करीत चिमण्या,  येती तेथे  । काड्या-कचरा आणूनी,  घरटी बांधत होते  ।। झाडून  घेई हळूवारपणे, तो कचरा  । भिंती आणि माळ्यावरी ठेवी,  तसाच पसारा  ।। स्वातंत्र्याची मुभा होती,  झुडपांना तेथे  । स्वच्छंदानें अंगणी वाढती,  सर्व दिशांनी ते  ।। जगणे आणि जगू […]

हॅपी डायरी

माझ्या आयुष्यातील  घडलेल्या एका प्रसंगी मला गवसलेली स्वतःला आनंदी ठेवण्याची आणि नकारात्मक वातावरणात देखील मनाचा समतोल राखण्यास मदत करणारी पद्धती म्हणजे ‘हॅपी डायरी’ होय. […]

‘ई-नाम’ प्रणाली शेतकरी हिताची ठरेल का?

शेतकरी केंद्रिबदू मानून बाजार समित्यांची रचना करण्यात आली. मात्र, ह्या समित्या आज राजकारणाचे अड्डे बनल्या आहेत. त्यामुळे बाजार समित्यांना पर्यायी व्यवस्था निर्माण करणे जरुरीचे म्हणावे लागेल. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणलेली इ -नाम प्रणाली बाजारपेठ म्हणून शेतकऱ्यांसाठी पर्याय ठरु शकेल काय? हा एक चिंतनीय प्रश्न आहे. […]

कायाकल्प!

आज कौसल्याबाईंना ते पुन्हा जाणवले. पांघरून नेहमीचेच होते. पूर्वी कधी, ते झोपताना डोक्यावरून घेतले की, पाय बाहेर जात नसत. हल्ली बरेचदा पाय बाहेर जात होते. काहीतरी बदलत होत. नक्की काय हे त्यांना कळेना. आज डॉक्टरांना सांगायला हवं.  […]

सुखी रहा तू लाडके

सुखी रहा तू लाडके,दिल्या घरी मोद हा मनी दाटला,जा सासरी।।धृ।। कन्यारत्न जन्मताच,आनंदलो वाढवले ना लाडात,धन्य झालो बालक्रीडा सुखविती,हो संस्कारी मोद हा मनी दाटला,जा सासरी।।१।। आला हो राजकुमार,नेण्या परी नववधू दिसे कशी,ही गोजिरी माय तुझी मालत्यांनी,ओटी भरी मोद हा मनी दाटला,जा सासरी।।२।। येता दाटुनी कंठ हा,काय करू पाठवणी करतो,कसा सावरू जा निवांत तू,वळू नको माघारी मोद हा […]

क्रौंच पक्षाला मुजरा

कारूण्यामधूनी उगम पावला   आद्य काव्याचा झरा वदन करितो क्रौंच पक्षा तुज घे,  मानाचा मुजरा….१, गमविले नाही व्यर्थ प्राण ते,  व्याध बाणा पोटीं टिळा लावला काव्यश्वरीने,  मानाने तुझ्या ललाटी…२, हृदयस्पर्शी जी घटना घडली,  तडफड तव होता कंठ दाटूनी शब्द उमटले,  पद्य रूप घेता….३, उगम पावता काव्य गंगा ही,  वाहू लागली भूलोकी वाल्मिकी, व्यास, ज्ञानोबा, तुका,  अशांचे आली […]

1 9 10 11 12 13 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..