नवीन लेखन...

बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

मिथुन चक्रवर्ती यांनी बी.एस.सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून अभिनयाचे अधिकृत शिक्षण घेतले. त्यांचा जन्म १६ जून १९५० रोजी झाला. करिअरच्या सुरूवातीला ऍक्शन आणि डान्ससाठी मिथुन चक्रवर्ती यांची खास ओळख निर्माण झाली होती. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘डिस्को डान्सर’ चित्रपटाने मिथुन चक्रवर्ती यांनी खऱ्या अर्थाने डान्सिंग स्टार बनवले. तर मृगया या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला […]

ख्यातनाम उर्दू शायर आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित शहरयार

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील आँवला गावात जन्मलेल्या अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार यांच्या कुटुंबात लष्करी सेवेची परंपरा होती. त्यांचा जन्म १६ जून १९३६ रोजी झाला. त्याचे वडिल पोलीस अधिकारी होते. त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. त्यामुळे त्याच्या प्राथमिक शिक्षणाचे काही दिवस वडिलांची पोस्टिंग असलेल्या ठिकाणी झालं. त्यानंतर हरदोईमध्ये काही वर्षे घातल्यानंतर त्यांना १९४८ मध्ये अलीगढला पाठवण्यात […]

सुप्रसिद्ध गायक, संगीतकार व निर्माता हेमंत कुमार

हेमन्ता कुमार मुखोपाध्याय उर्फ हेमंत कुमार यांना संगीताचे औपचारिक शिक्षण मिळाले नव्हते. त्यांचा जन्म १६ जून १९२० रोजी झाला. त्यांचा कुटुंबीयांचा संगीतक्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. कोलकाता येथील महाविद्यालयात शिकताना १९३५ साली त्यांनी आकाशवाणीवर गाण्याची चाचणी परिक्षा दिली आणि गायक म्हणून ते आकाशवाणीवर गायला पात्र झाले. गायनात गती असणाऱ्या हेमंत कुमार यांना साहित्यक्षेत्रात देखिल रस होता. १९३७ […]

कोकणातील भाजपचा ८० च्या दशकातील एकमेव चेहरा आप्पा गोगटे

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे देवगड विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा विधानसभेत नेतृत्व करणारे आप्पा गोगटे यांनी उभ्या हयातीमध्ये जनतेप्रती वडीलकीचे नाते जपले. आप्पा गोगटे सदरा, धोतर अशा साध्या वेशातील आमदार मंत्रालयात एखाद्या ठिकाणी जात असे तेव्हा नवागतास ते आमदार आहेत, याचा भासही कधी झाला नाही. पराकोटीची साधी राहणी, संयमी पण ठाम वक्तृत्व, वडीलकीचे नातं जपणारी व्यक्ति अशी अनेक वैशिष्ट्यं त्यांच्याबाबतीत सांगता येतील. […]

मराठी गायिका व अभिनेत्री आर्या आंबेकर

आर्या आंबेकरची आजी वर्षां आंबेकर सुद्धा एक शास्त्रीय गायिका आहेत. तिचा जन्म १६ जून १९९४ रोजी झाला. पार्ले टिळक विद्यालयात संगीत शिक्षिका, आकाशवाणी गायिका, काही ऑडिओ कॅसेटच्या संगीतकार अशी त्यांची ओळख. आर्याचे वडील समीर आंबेकर हे डॉक्टर आहेत ते उत्तम तबला वादक सुद्धा आहेत. आर्याची आई श्रुती आंबेकर यांनी जयपूर घराण्याचे खास शिक्षण प्रख्यात गायिका अश्विनी भिडे-देशपांडे […]

दैवी देणगी

लुळा पांगळा बसूनी एकटा,  गाई सुंदर गाणे, आवाजातील मधूरता,  शिकवी त्याला जगणे….१, जगतो देह कशासाठी,  हातपाय असता पांगळे मरण नसता आपले हाती,  जगणे हे आले…..२, लुळा असला देह जरी, मन सुदृढ होते जगण्यासाठी सदैव त्याला,  उभारी देत होते…..३, गीत ऐकता जमे भोवती,  रसिक जन सारे नभास भिडता सुरताना, शब्द उमटती वाह ! वा रे ! ….४, असमान्य ते एकचि मिळता, […]

जेष्ठ हार्मोनियमवादक पं. डॉ. विद्याधर ओक

डॉ. विद्याधर ओक म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वच म्हणावं लागेल. त्यांचा जन्म १५ जून १९५२ रोजी झाला. डॉक्टर, शास्त्रज्ञ, हार्मोनियम वादक, लेखक, संगीत संशोधक, ज्योतिषशास्त्रज्ञ असं परिपूर्ण व्यक्तिमत्त्व. गोविंदराव पटवर्धनांच्या या पट्टशिष्याने निष्णात हार्मोनियमवादक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. डॉ. विद्याधर ओक हे कलाक्षेत्राला ज्येष्ठ हार्मोनियम वादक आणि २२ श्रुतींचं अस्तित्व दाखवणारे संशोधक म्हणून परिचित आहेत. वैद्यकीय […]

ग्रिप्स नाट्य चळवळीचा सुवर्ण महोत्सव

मुलांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी आणि बालरंगभूमीचा आशय परीकथेच्या पुढे नेऊन ती सशक्त करण्यासाठी जगभरात उदयास आलेली ‘ग्रिप्स नाट्य चळवळ’ सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. ग्रिप्स नाट्यचळवळीत योगदान दिलेले जगभरातील रंगकर्मी जर्मनीची राजधानी बर्लिन येथे एकत्र आले आहेत. ग्रिप्स नाट्यचळवळीचा पन्नास वर्षांचा आढावा, मुलांचे भावविश्व आणि नाटक यांवर विचारमंथन; तसेच विविध भाषांतील नाटकांचे सादरीकरण अशा उपक्रमातून ग्रिप्सचा सुवर्णमहोत्सव […]

मराठी अभिनेते, गीतकार, निर्माते आणि दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले

श्रीरंग गोडबोले. खऱ्या अर्थाने चतुरस्र वल्ली. उत्तम लेखक… कवी… निर्माते… दिग्दर्शक आणि बरेच काही ! श्रीरंग गोडबोले हे खरोखर काव्यात्मक आविष्कार घडवू शकणारे रंगकर्मी आहेत. त्यांचा जन्म १५ जून १९६० रोजी पुणे येथे झाला. नाटक, सिनेमा अणि टेलिव्हिजन या सगळ्या माध्यमांमध्ये त्यांनी पेक्षकांना गुंगवलेलं आहे. श्रीरंग गोडबोले यांनी एस.एस.सी. पर्यंतचं शिक्षण पुण्यात घेतलं. कॉलेज रुईया, झेविअर्समध्ये […]

किसन बाबूराव हजारे उर्फ अण्णा हजारे

अण्णा हजारे यांचे वडील बाबूराव हजारे तेथील आयुर्वेद आश्रम औषधशाळेत मजूर होते. त्यांचा जन्म १५ जून १९३७ रोजी भिंगार, अहमदनगर जिल्हा येथे झाला. बाबूरावांचे वडील ब्रिटिश फौजेत सैनिक होते. किसन यांना सहा लहान भावंडे होती व कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्याच्या आत्याने किसनची देखभाल करण्याचे ठरवले व शिक्षणासाठी त्या त्याला मुंबईला घेऊन गेल्या. सातवीपर्यंत शिकल्यावर घरात […]

1 109 110 111 112 113 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..