गोवा मराठी चित्रपट महोत्सव
गोव्यात वर्षभर उत्सवी वातावरण असतं. त्यात दरवर्षीचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे सिनेरसिकांना पर्वणीच. विश्वभरातील हजारो प्रतिनिधी, फिल्ममेकर्स या महोत्सवात सहभागी होतात. त्यानंतर आयोजनाच्या बाबतीत म्हणायचा तर त्याहुनही सरस महोत्सव म्हणजे गोवा मराठी चित्रपट महोत्सव. यंदा हा बारावा महोत्सव असून 28, 29 आणि 30 जून रोजी याचे आयोजन केले असल्याची घोषणा आयोजक संजय शेट्ये यांनी केली आहे. […]