नवीन लेखन...

प्रभू दर्शन

महिमा कसा प्रभू तुझा आगळा, पावन करसी तूं भक्ताला, नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला   ।।धृ।। पुंडलीकाची महान भक्ती, माता पित्याचे चरणी होती, त्याची सेवा तुजसी खेचती, कसा उकलू मी ह्या कोड्याला,   ।।१।। नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला पातिव्रत्य हे दैवत समजूनी, पतिसेवेला घेई वाहुनी, सावित्रीने दिले […]

या मार्गाने थकवा दूर करा

सततचे काम, शरीराला विश्रांती न दिल्याने खूप थकवा आणि अशक्तपणा येतो. अशावेळी काम करायचे ठरवले तरी शरीर मात्र साथ देत नाही. या थकव्याला दूर करण्याचे उपाय हे आपल्याच हातात आहेत हे आपण काय लक्षात ठेवले पाहिजे. […]

‘तू’

क्षणी पालटली कळा तूझा हात हाती आला माझा रुतु बदलला।।१।। नवा उगवला दिस तुला बांधुनिया पाशी भिरभिरे अवकाशी।।२।। काही उरले ना काज तुझा ध्यास निशीदिनी तुच स्वप्नी जागेपणी।।३।। जीव भारलेला असा तुझ्या नावाच्या पुढती सारी संपतात नाती।।४।। भान काळाचे नुरले आता आयुष्य ते किती तुझ्या श्वासांची गणती।।५।। …….।।मी मानसी।।

कोण जाणे कसे ठांवे

कोण जाणे कसे ठांवे,मन आज भरून आले, आठवणींच्या आभाळात, एकेक ढग जमा झाले,–||१|| बघता बघता एकमेकात, ते कसे खेळू लागले, हृदयांतरी स्मृतींचे मग, बिलोरी आरसे हलू लागले,–||२|| स्मरणांच्या हिंदोळ्यावर, झोके घेत झुलू लागले, इकडून तिकडे पाय हलवत, मन सैरावैरा धावू लागले,–||३|| गतकाळाचा जोर घेऊन, हिंदोळा वारंवार हाले, वरती जाता क्षणिक सुख, भासते कधी उगीच खरे, खाली […]

काही असले नसले

काही असले नसले, तरी आनंदातच जगावे, काय आणले, काय न्यायचे, सर्वांनाच आहे ठांवे ,–!!! ,मी मी करत करत, कमरेला बांधून गोष्टी, पैसाअडका, सोने-नाणे, सारे ठेवायाचे पाठी ,–!!! शेतीवाडी, जमीनजुमला, भाईबंद हक्क सांगती, भाऊबंदकी होऊन निव्वळ, तुटतात सगळी नाती गोती,–!!! हे माझे ते तुझे, कशासाठी, आपपरभाव,-? स्वार्थ आपमतलब शेवटी, करून दु:खी होतो मानव,–!!! सख्खे, सख्खे न राहती, […]

मणिपूरचे लुकवाक लेक

३० ते ४० किमी परीघाचे गोड्या पाण्याचे सरोवर थेट क्षितीजापर्यंत पसरलेले,यात विविध आकाराची अनेक बेटे तरंगत होती. रात्रभरात ही बेटे तरंगत जात आपली जागा बदलतात. दुसरया दिवशी वेगळ्याच भागात दिसतात. पानवेलींच्या जाळ्यामुळे ती उभी राहतात. […]

हट्टी अनु ( बाल गीत )

एक होती अनु फुलासारखी जणू डोळे फिरवी गर्र गर्र पाऊल टाकी भरभर तिला लागली भूक गडू दिला एक बघितला रिकामा गडू तिला आले रडूं आईने दुध भरले कांठोकांठ ओतले तिला हवय जास्त दूध आहे मस्त रडरड रडली आदळ आपट केली सांडूनी गेला गडू पाठींत बसला मात्र धम्मक लाडू — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख २

…. या पत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर वाहिनीला लिहितात कि ‘अशीच सर्व फुलें खुडावी’ आणि श्री रामाच्या चरणी (या देशासाठी ) अर्पण व्हावी. इतकी प्रचंड देशभक्ती असलेल्या सावरकरांना मात्र स्वराज्य मिळाल्यानंतर कोणता सन्मान प्राप्त झाला ? त्यांचे कोणते विचार आम्ही आमलात आणले.उलट सावरकरांना “जातीच्या ” भिंतीत चिणून आम्ही त्यांचा दररोज खून करीत आहोत ” आज स्वतःच्या पोळीवर तूप ओतून घेण्यासाठी धडपडणारे “नेते “पाहिल्यावर सावरकर स्वर्गातून म्हणत असतील… ” हेच फळ का मम तपाला ” […]

हर मर्ज की दवा…. ज़िंदा तिलिस्मा… 

जिंदा तिलिस्मात … खरं तर बोली भाषेत जिंदा तलिस्मा… living magic …. जादुई औषध .. एकही कृत्रिम रसायन न वापरता केलेलं … सगळ्या गोष्टी नैसर्गिक … वनौषधी वापरून केलेल्या … म्हणूनच बहुतेक इथल्या उर्दू-हिंदी बोली भाषेत … हर मर्ज की दवा … इतका हैदराबादच्या जनमनाचा त्यावर विश्वास आहे (जसा आपल्याकडे अमृतांजन … कैलास जीवन यावर असतो तसा). पुढच्या वर्षी बरोबर १०० वर्ष होतील, या युनानी औषधाला. हकिम मोहम्मद मोईझुद्दीन फारुकी यांनी हे जादुई औषध १९२० साली निर्माण केलं आणि त्याचा प्रभाव … करिष्मा थोडा थोडका नाही तर शंभर वर्ष लोकमनावर आहे. […]

यश तुमचंच आहे..!

…. सर्वाना मनाप्रमाणे यश मिळावे ही सदिच्छा.. परंतु काही कारणाने अपयश आलेच सर्वप्रथम पालकांना विनंती कि, मुलांच्या अपयशाचे भांडवल करण्यापेक्षा, त्याची इतरांशी तुलना करून चारचौघात त्याला अपमानित करण्यापेक्षा त्याला समजावून घेण्याची गरज आहे. पुन्हा नव्याने प्रयत्न करण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. […]

1 114 115 116 117 118 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..