आज यमुनेचा उर
आज यमुनेचा उर,किती भरुनी आला, आनंदाने पाण्या तिच्या, पूर भरतीचा आला,–!!! गोकुळातील नंदकिशोर, मदतीस तिच्या धावला, कालिया — मर्दनाने, गोकुळीचा त्राता झाला,–!!! गोकुळ तिचे सर्वस्व असता, बाल कान्हा तारक झाला, भितीने तिची काया थरथरता कृष्णस्पर्शे, जीव कृतार्थ झाला-! गोकुळावरील संकट केवढे, गोपगोपिकांवर जीवघेणे, गारठून भीतीने गेले, कृष्णावताराने वाचवले,–!!! लहानगे ते पुढे धावतां, बेचैनी येईल त्यांच्या चित्ता, […]