हे टिपूर चांदणे
हे टिपूर चांदणे, सख्या तुला बोलावे, आकाशातील घनमाला, घराची तुला वाट दाखवे, –||१|| डोईवरचा चंद्रमा, माझिया प्रियाला स्मरण देई, एक चंद्र घरी वाट पाहे, सारखा सूचित करत राही,–||2|| शांत नीरव वातावरणी, बघ सजणा बोल घुमती, विरहव्याकूळ तुझ्या प्रियेचे, कानात कसे गुपित सांगती,||3|| भवतीचा काळोखही, येण्याची तुझ्या वाट पाहे, मिलन कल्पून मनाशी, दोन जिवांची संगत देई, –||4|| […]