सुवर्णचंपक फुलला अंगणी
सुवर्णचंपक फुलला अंगणी, त्याची शोभा उठून दिसे,पिवळी सोनेरी केशरट फुले, फांदोफांदी मोहक जुळणी,-! नजर ठरेना झाडावरी, उन्हाची मजा घेते सावली , फुलांतून इवले कवडसे, डंवरून कसे झाड फुलोरी,–! वरचा संभार सांभाळत चाफा, खंबीर उभा राही, सोनसळी अभिषेक फांद्यातून मग चालू होई,–!!! फुलां -फुलांतील दरवळ, वाऱ्यावरती मस्त सुगंध, कोणाचाही आत्मा तृप्त, झाड स्वतः तरी तप्त, –!!! […]