उपयोगीता हेच मूल्य
चष्मा लावूनी करित होतां, ज्ञानेश्वरीतील पारायण दृष्टीमधले दोष काढले, चाळशीचा आधार घेवून….१, फूटूनी गेला एके दिवशीं, चष्मा त्याच्या हातामधूनी पारायणे ती बंद पडली, दृष्टीस त्याच्या बाध येवूनी…२, चालत असता सरळपणे, दैनंदिनीचे कार्यक्रम खीळ पाडूनी बंद पाडी, क्षुल्लक वस्तू क्षुल्लक दाम…३, वस्तूचे ते मूल्य ठरते, तिच्या उपयोगिते वरती तोलण्यास ते धन न लागे, मूल्य मापन जेंव्हां होती….४ […]