सशक्त नायिकाप्रधान भुमिका करणाऱ्या माला सिन्हा
६० आणि ७० च्या दशकांत आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या बळावर आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारी अभिनेत्री माला सिन्हा यांचा आव्हानात्मक, वैविध्यपुर्ण व चाकोरीबाह्य भुमिका स्वीकारण्याकडे नेहमी कल होता. अभिनेता, दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या प्यासा या चित्रपटात अभिनय करण्याची त्यांना संधी मिळाली. प्रियकाराला नाकारुन एका श्रीमंत व्यक्तीशी लग्न करणार्या तरुणीच्या या भुमिकेसाठी आधी मधुबालाचे नांव गृहित धरण्यात येत होते. माला सिन्हाने या भुमिकेला योग्य तो न्याय दिला व हा चित्रपटच तिच्या कारकिर्दीत एक मैलाचा दगड ठरला. […]