नवीन लेखन...

तुझ्या माझ्या मिलनी

तुझ्या माझ्या मिलनी,गंधाळली रातराणी, वारा सांगे गुजगोष्टी, तुझी माझी प्रेम कहाणी, चाफा वरती वरती फुले, त्याचे झुळकांवरी झुले, जाईजुईचे मांडव खाली, मोगऱ्याचे त्यास विळखे सायलीचा नाजूक मंद, गंध सुवासिक करे धुंद, अबोलीचे झुबके केवढे, कानोकानी सांगते गुपित, उधळीते बकुळ आपुली, सुगंधित फुले चहूकडे, दरवळू दे प्रीत सुगंधी, घालते कुलदेवां साकडे, शैया गुलाबांनी फुलली, बहरून ये पाकळी, […]

कोण दिसे हा पाण्यामध्ये

कोण दिसे हा पाण्यामध्ये, असावा माझाच भाईबंद, चोच बांकदार, रूप देखणे, मनाने दिसतोय स्वच्छंद, गुबगुबीत पांढरी पाठ, कोरीव वर काळ्या रेघा, नजर शोधक पाण्यात, भक्ष्यच भागवेल भुका , सुळकन जो वर येईल, मटकावेन आधी त्याला,–!!! कळणारही नाही याला, कधी गिळले मी माशाला,-? डोळे तीक्ष्णमाझे, नजरही अगदी करडी, पाण्यातील या पक्ष्याची, मात्र भासे मज बेगडी,–!!!! हिमगौरी कर्वे.©

शान्त समईत जशी वात

शान्त समईत जशी वात, तशी समाजात स्त्री जात, जळून जळून प्रकाश देत, क्षणिक फक्त मोठ्या होत,–!!! पणतीची ज्योत तशी, आमुची ही असे जात,– जगच छोटे भोवतालचे,– स्वयंप्रकाशी मोठे करत, लामणदिव्यात उर्जास्त्रोत, रात्रंदिनी सारखे *अविरत, मंद असूनही सतत, कार्यरत, भोवताली प्रकाश पसरवत,–!!! नंदादीपातील जशी ज्योत, स्त्री तशी तिच्या संसारात, हळूहळू अगदी तेवत,–!!! दुसऱ्याला प्रकाशमान करत,–! निरांजनातील छोटीवात, […]

कॉमन मॅन

हा कॉमन मॅनच आहे, ज्याच्या जिवावर उभे राहतात इमलेच्या इमले. ज्याच्या जिवावर चालतोय गाडा व्यवस्थेचा, लोकशाहीचा, विश्वासाचा, परंपरेचा अन संस्कृतीचा. तोच सगळं सांभाळतोय हे सारं. सगळे अन्याय अत्याचार सहन करूनही तो मात्र फार आशावादी. त्याला निश्चितपणे वाटतंय हे सारं बदलणार आहे. आज ना उद्या परिस्थिती बदलेल. सारं काही चांगल होईल असे चित्र तो मनाशी रंगवत असतो. […]

जन्म स्वभाव

गोड शब्द बोबडे, लकब त्याची मनास आवडे, शब्दांची भासली जाण,  नव्हते भाषेचे अजुनी ज्ञान, भावनांचा उगम दिसला,  मनी व्यक्त होई हालचालीतूनी रागलोभ अहंकारादी गुण,  दिसून येती जन्मापासून देश-वेष वा जातही कुठली,  सर्व गुणांची बिजे दिसली हळूहळू बदले बाह्यांग जरी, उपजत गुण राही अंतरी प्रसंग घडता अवचित ,  बाह्य जगाला विसरतो उफाळून येती सुप्त भावना, मानवी धर्माच्या […]

सोडून आले आहे मी सगळे

एका हिंदी कवितेचा अनुवाद,थोडे काही शब्द घालून माझे,–!!! सोडून आले आहे मी सगळे, आपल्यात घडलेले सारे, माझे तुझे सारे किस्से, खरंच मी सोडून आले, रडले डोळे माझे, अगदी हमसाहमशी, तुझ्याच फक्त घरापाशी, सोडून आले सगळे, रुसणं, रागावणं, मनवणं मुद्दाम जिद्दीने भेटणं, अशा कित्येक स्मृती, सोडून आले तुझ्या दाराशी,-!!! एकत्र घालवलेले रम्य क्षण, डोळ्यात साठवलेले, अशा सगळ्या […]

प्रसारमाध्यमांचे संस्कार व विकार 

प्रसारमाध्यमांतून वास्तूशास्त्रवाले, कोचिंगवाले, भविष्यवाले, संत, महात्म्ये आपले विकार, संस्कार म्हणून बिंबवत आहेत. हीच आजची शोकांतिका आहे. संस्काराच्या टिपकागदाने विकार टिपलेच पाहिजेत, नाही तर रंगाचा बेरंग व्हायला वेळ लागणार नाही.  […]

जखम

खरंच रे वेड्या,तुला कळला नाही, माझ्या मनीचा भाव, नकळत कोरून गेलास,न भरलेल्या जखमेचा घाव… गळून पडेल का ही जखम? की जाईल ती पण सुखून, की चीघळून जाईल पुन्हा,सोसेल का हे तळपतं ऊन? तू दिली आहेस म्हणून खरंच का हिला जपून ठेवू? सांगना,सजवून धजवून अंगावरचं टपोरं गोंदण मानून घेवू ? मलम नाही रे हिला,असा कसा रे केलास […]

चल सये ग झणीं

चल सये ग झणीं, मांडू या खेळ अंगणी, लहान वयातली भातुकली, धांदल बाहुलीच्या लग्नाची,–!!! लग्न करण्या त्यांचे, घालत होतो घाट, धावपळ करत सगळी, मांडायचा सर्व थाट,—-!!!! इवले इवले बाहुला बाहुली, सुंदर गोंडस खूप छोटुकली, मुंडावळ्या बांधून त्यांना, उभे सगे घेऊनी हाती,–!!! सासर माहेर सगळे मिळुनी, अंगण जायचे गजबजुनी, ठुमकत येई वरमाई, नाकात झोकात नथ घालुनी,–!!! देण्याघेण्यावरून […]

माओवाद संपवण्याकरता सुरक्षाविषयक उपाय योजना

निवडणुकीच्या काळामध्ये वाढलेला माओवादी हिंसाचार अजून वाढतच आहे. त्यामुळे 23 मेला मिळणाऱ्या नवीन सरकार पुढे माओवाद कसा संपवायचा हे एक मोठे आव्हान असणार आहे. या लेखामध्ये आपण माओवाद्यांच्या विरुद्ध सुरक्षात्मक उपाय अजुन मजबुत करता येतील यावर विचार करू. […]

1 134 135 136 137 138 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..