नवीन लेखन...

आत्मा हाच ईश्वर

आत्म्याला ओढ असते     ईश्वराच्या मिलनाची जाण सदेव राहते     प्रभुमय स्वरुपाची   ।।१।। अंशात्मक भाग असे    आत्मा हा परमात्म्याचा उत्कंठ ते  आकर्षण     गुणस्वभाव तो त्याचा   ।।२।। आत्म्यास पडले असे    बंधन ते शरीराचे जीवन कार्ये करुनी    प्रयत्न करी मुक्तीचे   ।।३।। मुक्त होई त्या क्षणीं    अनंतात सामवतो परमेश्वरि रुपांत    विलीन होऊन जातो   ।।४।। आत्मा मुक्त होत असे     देहकर्म फळावर […]

पहाट…

भल्या पहाटे कोकीळ नावाचा भाट गाऊ लागतो त्याच्या भैरवाचे सूर मनात रूंजी घालू लागतात थंडगार झुळुकांनी आम्रवृक्षांचा गंधित धूप दरवळू लागतो.. उगवत्या सूर्यबिंबाच्या मस्तकी टिळ्याने शुचिर्भूत आकाश अधिकच तेजस्वी दिसते पक्ष्यांच्या कूजनाने काकडआरती होते पुराणपुरुष डोंगरही आळस झटकून वेदऋचा म्हणण्यास ताजेतवाने होतात आणि हा निसर्गाचा व्यापार पाहत मी जागी होते… पौर्णिमेचे चंद्रबिंब उत्तररात्री डोळ्यात साठवून मिटलेल्या […]

किती रंग या जीवनी पहावे

किती रंग या जीवनी पहावे, कितीदा पुन्हा नव्याने जगावे,रोज रोज नवीन ताजे, दुःख जिवापाड सोसावे,–!! ठरवलेले नेहमी चुकते, विपरीत काही घडते, अगणित अपेक्षांचे ओझे, इवल्या हृदयाने पेलावे,-? जे विधायक, ते दूर राहते, नकारात्मक ते सारे घडते, आपल्याच जिवाचा बळी रोज नव्याने पहावे लागते,-!! मदतीचा हात करता पुढे, आरोपांना पेंव फुटते , आंधळ्या निर्जन आयुष्याला , रानावनीची […]

मराठी लेखिका व समालोचक कुसुमावती देशपांडे

ग्वाल्हेरला भरलेल्या त्रेचाळीसाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान कुसुमावतींना मिळाला. विदर्भातील प्रसिद्ध वकील रावबहादुर रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. तसेच सुप्रसिद्ध कवी आत्माराम रावजी देशपांडे ऊर्फ कवी अनिल यांच्या पत्नी.  […]

रुद्रा – कादंबरी – भाग २३

उंचेपुरे, कृश प्रकृतीचे प्राध्यापक डॉ. जोगदंडाच्या चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज विलसत होते. त्यांनी विरळ होत जाणारे डोक्यावरचे पांढरे केस मागे वाळवून व्यवस्थित विंचरले होते, ते त्यांच्या रुबाबदारपणात भरच घालत होते. सैलसर कोट-पॅन्ट आणि पांढराशुभ्र शर्ट त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसत होती. […]

काही असले नसले…

काही असले नसले,तरी आनंदातच जगावे, काय आणले, काय न्यायचे, सर्वांनाच आहे ठांवे ,–!!! ,मी मी करत करत, कमरेला बांधून गोष्टी, पैसाअडका, सोने-नाणे, सारे ठेवायाचे पाठी ,–!!! शेतीवाडी, जमीनजुमला, भाईबंद हक्क सांगती, भाऊबंदकी होऊन निव्वळ, तुटतात सगळी नाती गोती,–!!! हे माझे ते तुझे, कशासाठी, आपपरभाव,-? स्वार्थ आपमतलब शेवटी, करून दु:खी होतो मानव,–!!! सख्खे, सख्खे न राहती, परस्परांच्या […]

गोंदियाजवळील नवेगाव बांध व ईटीया डोह

नवेगाव बांध गोंदिया पासून ५५ किमी. अंतरावर, नागपूर गोंदिया हे अंतर १७० किमी. ही जागा भारतातील पक्षी व स्थलांतरीत पक्षांचे माहेरघर आहे. नवेगाव बांध म्हणजे ७५ फूट लांब मातीचा बंधारा ज्यामुळे मोठा जलाशय सात डोंगरांच्या कुशीत पसरलेला आहे,चोहोबाजुनी घनदाट झाडी. […]

इंद्रजीत खांबे; निराकारातून आकाराकडे..!!

मी कायमस्वरुपी मुंबईत मुक्कामाला असलो तरी, माझं मूळ असलेल्या सिंधुदुर्गातल्या कला जगताशी मी बऱ्यापैकी परिचित आहे. मला मुळातच कलांची आवड असल्याने, एखाद्या कलावंताशी ओळख असणं, हा मी माझा बहुमान समजतो. कला याचा अर्थ माणसाला व्यक्त होण्यास वाव देणारं लेखन, कवीता, चित्र-शिल्प-नाट्य इत्यादी कोणतंही माध्यम. सिंधुदुर्गातल्या अशा बहुतेक क्षेत्रातल्या कलावंतांना मी ओळखतो, पण इंद्रजीत खांबे हे नांव मी प्रथमच ऐकलं होतं आणि ते ही फोटोग्राफी क्षेत्रातलं..! […]

हिरव्या पानात लगडलो

हिरव्या पानात लगडलो, पांढऱ्या शुभ्र मोगरी कळ्या, एकेकच हळूहळू जन्मतो,स्वभाव धर्मानेफुलणाऱ्या, गोऱ्या रंगावरी आमुच्या, जनहो नका हो भाळू, टपोरेआकार पाहुनी, मोहून नका हो हाताळू, कौमार्य फुलते आमचे, दुरुन बघावे, हेच उचित, मुसमुसत्या तारुण्याला, ठेवा तुम्ही अलगद, मगच उमलेल फूल हे सुंदर , येईल मोगऱ्याला बहर, स्पर्श न करता नेत्रसुख घेता, घ्या हो आमुचा आस्वाद, किती थोडे […]

विरोघांत मुक्ति

भक्ति करुन प्रभूसी मिळवी, दिसले आम्हा ह्या जगती परि त्याचाच विरोध करुनी, कांही पावन होऊन जाती लंकाधिपती रावण याने, रोष घेतला श्रीरामाचा जानकीस पळवून नेई,  विरोध करण्यास प्रभुचा झाली इसतां आकाशवाणी,  कंसास सांगून मृत्यु त्याचा तुटून पडता देवकीवरी,  नाश करण्या त्याच प्रभुचा प्रभी अवताराचे ज्ञान होते,  परि विरोध करीत राही होऊन गेले तेच प्रभूमय,  सतत त्याचाच […]

1 140 141 142 143 144 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..