चादर कायेवर लपेटून धुक्याची
(एका हिंदी कवितेचा मुक्त अनुवाद) चादर कायेवर लपेटून,धुक्याची, पायवाटेची सैर करावी, थेंब स्पर्शती पायांना अनवाणी, जाणीवही ती सुखावह किती,–!! निळे-गहिरे स्वैर तरंग, हृदयाला जेव्हा छेदती, असेच आपुले गुपित एखादे, ते कसे उलगडती,–! केसांच्या बटांना स्पर्शून, झुळूक जाते एखादी, आपल्या प्रेमाची जाणीव, देऊन जाते ना कधी,–!!! दूरवर उभ्या झाडांवर, पक्षी कूजन करिती, हृदयाला ताजेतवाने, करुन सोडती अगदी, […]