नवीन लेखन...

डॉ. विल्‍फ्रेड बिगलो

दुसर्‍या महायुद्धाच्‍या काळात डॉ. ड्वाईट हार्केन यांनी हृदयावर शस्‍त्रक्रिया करण्‍याची एक पद्धत विकसित केली. या पद्धतीने केलेल्‍या शस्‍त्रक्रियेत प्रथम हृदयाला लहानसे छिद्र पाडण्‍यात येत असे. मग त्‍या छिद्रातून हाताचे बोट हृदयात घालून अरुंद झडप (व्‍हॉल्‍व्‍ह) थोडीशी मोठी करण्‍यात येई. हळूहळू हृदयशल्‍यचिकित्‍सकांना यात प्राविण्‍य मिळाले व अशा शस्‍त्रक्रिया सुलभतेने होऊ लागल्‍या. ही झाली ‘क्‍लोज्‍ड हार्ट’ अथवा आंधळी […]

देशद्रोहासम गुन्हा दाखल करा

जर कसाबवर देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तर मग या पुलाच्या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या महानगरपालिका, राज्य शासन आणि रेल्वे प्रशासनातील संबंधीत अधिकारी व या विभागाचे नगरसेवक, आमदार व खासदार यांच्यावर देशातील निरपराध नागरीकांच्यी जिविताविरुद्ध संगनमताने कट रचल्याचा गुन्हा का दाखल होऊ नये? देशाच्या नागरीकांविरुद्धचा कटाचा गुन्हा, देशद्रोहाच्या गुन्ह्यासारखाच मानला जावा. […]

नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर

नाटककार, कथाकार आणि पटकथाकार म्हणून सर्वांना परिचित असलेलं नाव म्हणजे मधुसूदन कालेलकर. त्यांची पटकथा असलेले एकाहून एक दर्जेदार चित्रपट यशस्वी होऊ लागले आणि सिद्धहस्त पटकथा लेखक म्हणून त्यांचा लौकिक झाला. एका मागोमाग एक असे त्यांचे ७५ पेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित झाले. चित्रपटाबरोबर प्रेक्षकांची आवड ओळखून त्यांनी विपूल नाट्यलेखन केले. […]

ज्येष्ठ गायिका श्यामा चित्तार

‘ओम जय जगदीश हरे’ सारखे अजरामर गीत गाणाऱ्या ज्येष्ठ गायिका श्यामा चित्तार यांचा ‘अनाग्रही स्वरमुग्धा’ असा त्यांचा उल्लेख केला जायचा. आपले काम नेटाने करायचे आणि त्याचा आनंद घ्यायचा ही वृत्ती त्यांनी आयुष्यभर जोपासली. श्यामा चित्तार यांनी मोजकीच पण लक्षात राहणारी गाणी गायली. […]

माझं काही.. उरलं नाही.

‘माझं काही……… उरलं नाही.’ जीवनांत या जगण्यासारखं, फार काही राहिलं नाही…. निराश झालं आहे मन, आत्ता काही उरलं नाही…. नाही नोकरी – नाही पैसा, फक्त होता आधार तुझा…. पण…. तुझ्या जाण्यानं, तो – ही आत्ता राहिला नाही…. जीवनांत मी इतरांसारख, फार असं काही केलं नाही…. फक्त तू.. अन् तुझा विचार, तुझ्याविनं काही पाहिलं नाही…. माझं माझं […]

तुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय?

लहान मुले हे नेहमीच मोठ्यांना फॉलो करतात आणि त्यामुळेच लहान मुलांमध्येही लठ्ठपणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. आई-वडिलांची व्यस्त जीवनशैली, मुलांची खाण्यापिण्याची निवड, जंक फूड आणि तासंतास मोबाईलचा वापर ही सध्या लहान मुलांचा लठ्ठपणा वाढण्यामागची महत्वाची कारणं आहेत. म्हणून आज मी ह्या सगळ्यावर कशाप्रकारे मात करता येईल ह्यासंबंधी काही टिप्स येथे देणार आहे. […]

शबरीमलाच्या निमित्ताने..

शबरीमालाच कशाला, आपल्या प्रत्येक रूढी-प्रथा-परंपरा या का आणि कधी अस्तित्वात आल्या, त्या त्याकाळची समाज व्यवस्था, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती आणि त्यातील किती परंपरा आता सुरु ठेवायला हव्यात आणि कालानुरूप त्यात बदल करावेत की नाही ह्याची कल्पना अभ्यासांती प्रत्येकाला येऊ शकेल. हा अभ्यास केवळ हिन्दूंनीच करावा असं माझं म्हणणं नाही. आपल्या देशातील सर्वच धर्म-पंथाच्या लोकांनी करणं आवश्यक आहे. […]

रसिक हो

कौतूक करिती प्रियजन आपले ते मन तेंव्हा किती हो भरूनी पावते  ।। नवनिर्मितीस नेहमी प्रेरणा मिळता मनात नवी उमेद सतत जागते  ।। सभोवती आपल्या असणे पारखी या सारखी समाधानाची गोष्ट नसते।। रसिकांच्या कौतुकाची पावती ही तर कलावंत मनास नेहमी हवी असते   ।। नशीबवान असतात कलाकार असे ज्यांचे रसिकांशी नाते जुळत असते   ।। शब्द -सूर जुळता संगीत […]

मै भी चौकीदार?

भादूर. आमच्या सोसायटीचा वाॅचमन. त्याचं नांव ‘बहादूर’, पण तो ‘भादूर’ असा उच्चार करतो, म्हणून आम्हाही त्याला भादूरच म्हणतो. नेपाळकडचाच आहे. आडनांव माहित नाही. विचारल्यावर एकदा सांगितलं होतं त्याने, पण त्याचा उच्चार माझ्या कानांना इतका विचित्र वाटला, की ते लक्षात राहूनही माझ्या लक्षात राहीलेलं नाही. पण ते थापा नक्की नव्हतं. बुटकासा, गोरा, गरीब आणि प्रामाणिकही..! […]

1 156 157 158 159 160 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..