नवीन लेखन...

विश्वाची उत्पत्ति सांगणारा सिद्धांत

….. पण अध्यात्म याचे उत्तर देते जसे “ पाहिजे कवण हे अवघे विए | तव मूळ ते शून्य || ” (ज्ञाने 8.24) वरील वाक्य ज्ञानेश्वरी मधले आहे त्याचा अर्थ – हे सर्व कोणी निर्माण केले पहाता मुळातून शून्यातून निर्माण झाले असे दिसते .(It means the world is created by out of nothing), असेच गीतेतील एक श्लोक आहे”. […]

मुक्तछंदात्मक

महिला दिनानिमित्त, स्त्रीत्वाच्या साऱ्या आभाळाला, पेलणे सोपे नाही, नाजूक साजूक धाग्यांना, कणखर बनवणे सोपे नाही, कुठे कुठे पोहोचत, उंची गाठत, आपले हात, फैलावत, ध्येय गाठणे सोपे नाही, कर्तव्यकर्मांचे विळखे सांभाळत, सांभाळत जगणे सोपे नाही, आपले ध्येय गाठताना, खंबीर भूमिका निभावणे, याच अंतिम हेतूने जगणे, सोपे नाही, संवेदना भावना यातना वेदना, सोसत निमूट श्वास घेत राहणे, सोपे […]

शुद्धतेत वसे ईश्वर

खिन्न मनानें बसला होता,  उन्हांत एका खडकावरी  । डबके घाण पाण्याचे,  वातावरण दुषित करी  ।। किड्या-मुंग्यांचे वारूळ तेथें,  आणिक पडला काडी कचरा  । नजिक येईना वाटसरूं कुणी,  बघूनी सारा गालिच्छ पसारा  ।। सोडून देऊनी निवारा ,  नदीकांठच्या शिखरीं गेला  । निर्मळ करूनी जागा,  आश्रम त्याने एक बांधला  ।। बाग फुलवूनी सुंदर तेथें  फळा फुलांना येई बहर  […]

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग-४

आमची भाषा टिकेल, हें ठीक. पण मग आतां स्‍वस्‍थ बसायचं कां? आपल्‍या जनजीवनात, व्‍यापार-व्‍यवहारात इंग्रजीच्‍या तुलनेने आपल्‍या मातृभाषेला दुय्यम स्‍थान मिळूं नये, असं आम्‍हाला जर वाटत असेल, तर आपण त्‍यासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत. आपल्‍या भाषांना आधुनिक संदर्भात समृद्ध बनविण्‍यासाठी झटलं पाहिजे. त्‍यासाठी करायच्‍या काही गोष्‍टींकडे आपण एक नजर टाकू. […]

लक्षवेधी – स्वप्नाली पाटील

साधारणपणे दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २००७ – २००८ साली ठाण्यातल्या घंटाळी मंदिरात मी आणि स्वप्नाली पहिल्यांदाच एकमेकांसमोर आलो. निमित्त होतं गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या एका शूटचं. या मंदिराच्या आवारात असलेल्या डौलदार झाडांच्या बॅकग्राऊंडला आम्ही शूट करत होतो. मराठमोळी संस्कृती उठून दिसावी असाच पेहराव स्वप्नालीचा होता. लाल रंगाची नक्षीदार साडी, नाकात नथ, लाल रंगाची मोठाली टिकली, अंबाडा त्यावर हळुवारपणे सजलेला मोगऱयाचा गजरा आणि या सगळ्यात तिचा खुललेला चेहरा. हे सारं काही कॅमेऱयात बंदिस्त करण्याची माझी धडपड सुरू होती. अत्यंत प्रसन्न वातावरणात आमचं शूट तासाभरात पार पडलं. […]

अदृश्य जग आणि विज्ञान

हे  विश्व आपण पाहतो ते खरच real आहे का ? जसे स्वप्नात आपल्याला जागे झाल्याशिवाय स्वप्न की अस्तित्व कळत नाही अगदी तसेच या अस्तित्वाला समजायला तुम्हाला जागाव  लागेल (You have to awake). असे म्हणू शकतो कारण आपल्या संसारी जीवनात आपण तितके व्यस्तच आहोत. त्यापासून थोडे लक्ष वेधण्यासाठी सद्या  काही चर्चेत असलेल्या science बद्दल काही रहस्यमय facts आणि theory आपण पाहणार आहोत . […]

उलट पालट सारे घडे

उलट पालट सारे घडे, दिसानंतर रात्र चढे, खेळ सारखे निसर्गाचे, त्याचेच ना कोडे पडे,–!!! कधी उष्णतेची रांस, कधी शीतल चंद्रप्रकाश, कधी मुसळधार पाऊस, केव्हा शांत निरभ्र आकाश,–!! कधी पृथा हिरवी हिरवी, कधी सचैल पहा भिजलेली, कशी रुक्ष कोरडी-कोरडी, कधी थंडीने समेटलेली,–!!!! धरेवर असंख्य झाडे, वृक्ष,लता आणखी वेली, बहरलेली फुले पाने, विविधतेने का नटलेली,-?!! एक नसे दुसऱ्यासारखे, […]

आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : भाग १-अ

भारतावर परचक्र आलेलं आहे याची किती लोकांना कल्‍पना आहे ? आपण परकीयांची गुलामगिरी स्‍वेच्‍छेने पत्‍करली आहे याची किती लोकांना जाणीव आहे ? ही गुलामगिरी बौद्धिक, आर्थिक, औद्योगिक व सांस्‍कृतिक आहे हे किती लोकांच्‍या लक्षात आलं आहे ? अन् अशा तर्‍हेची गुलामगिरी राजकीय पारतंत्र्याइतकीच भयानक आहे. याचा किती लोकांनी विचार केला आहे ? […]

पूजा भाव

पूजा पाठ करीत असतां    पूजा गेलो विसरुनी प्रभुचरणी ध्यान लागतां   भान गेले हरपूनी पूजेमधल्या विधीमध्यें   बहूत तास घालविले मनी घेऊनी आनंदे   पूजा कर्म केले पूजेमधली सर्व कृतिं   कटाक्षाने पाळली नेटकेपणासाठी   योग्य साधने जमविली वर्षामागून वर्षे गेली   पूजाअर्चा करुनी खंत मनी राहून गेली   झालो नसे समाधानी मूर्ती समोर बसूनी    एक चित्त झालो ध्यान अचानक लागूनी    स्वतःसी विसरलो […]

रुद्रा – कादंबरी – भाग १४

मनोहर ‘पंजाब ढाब्या’च्या मागच्या लॉनवर आला, तेव्हा जसवंत अधीरतेने एका कोपऱ्यातल्या टेबल जवळ  उभा असलेला दिसला. मनोहरने आसपासचे निरीक्षण केले. लॉनवर फारशी गर्दी नव्हती. बहुतेक सुटे सुटे टेबल होते. जसवंतच्या टेबलच्या आसपास कोणी नव्हते. दूर एक मुसलमान आपल्या मुलासोबत काहीतरी खाण्यात दंग होता. मनोहर निश्चित मनाने जसवंतच्या टेबलवर जाऊन समोर बसला. “जसवंत, राघवला तुझा संशय आला […]

1 157 158 159 160 161 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..