नवीन लेखन...

दक्षिणेचे सुपरस्टार कमल हासन

दक्षिणेचे सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असलेले कमल हासन यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी `कलतूर कन्नम्मा’ या तमिळ भाषेतील चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. बॉलिवूडमध्ये त्यांनी ‘एक दुजे के लिए’ या सिनेमाद्वारे पदार्पण केले होते. कमल हासन यांनी १९० चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. […]

पाणबुडी ( submarine ) म्युझियम – भारतीय नौदलाचे गौरवस्थान

भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील आंध्र राज्यातील विशाखापटटम ( वैझ्याग ) हे पुरातन काळापासूनचे महत्वाचे बंदर. ब्रिटीश राज्यकर्त्यानी मोठी गोदी बांधून समुद्र व्यापार मार्गाचे महत्वाचे ठिकाण तयार केले. आज भारतीय नौदलात त्याचे अनन्य साधारण महत्व असून सबमरीन्सचा महत्वाचा बेस येथे आहे. विशाखापट्टणम येथील रामकृष्ण बीच वरील सबमरीन म्युझियम पाहून डोळ्याचे पारणे फिटले. प्रत्येक भारतीय नागरीकाने त्याला भेट देऊन मानाचा मुजरा दिलाच पाहिजे अशी ही विशेष जागा आहे. आशिया खंडातील अशा तऱ्हेचे हे एकमेव म्युझियम आहे. […]

साठा उत्तराची कहाणी

पुणे येथील सुप्रसिद्ध `पद्मगंधा प्रकाशन’ चे प्रमुख आणि मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष श्री अरुण जाखडे यांचे जीवनानुभव कहाणी त्यांच्याच शब्दात ! […]

इंद्रियें सेवकासम

खिडकीमधूनी टिपत होतो बाह्य जगाचे द्दष्य आगळे लोभसवाणें चित्र बघण्या आतूर होऊन गेले डोळे नयन नव्हते बघत ते बघत होतो मीच खरा खिडकीसम नयनातूनी द्दष्य उमटते आंत जरा संगीताचे सूर निनादूनी लहरी त्यांच्या उठताती कर्णा मधल्या पडद्यायोगे आनंद मजला देवून जाती मालक असूनी मी देहाचा इंद्रिये सारी असती सेवक ती केवळ साधने असूनी आंतील ‘मीच’ असे […]

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग २ – ब

भारतीय भाषांचा विचार करतांना, भारतीयांचं बहुभाषिकत्‍वही विचारात घ्‍यायला हवं. अगदी २००० वर्षांपूर्वी पाहिलं तरी, संस्‍कृतच्‍या बरोबरच पाली व अर्धमागधी व शौरसेनी, पैशाची, महाराष्‍ट्री ह्या भाषा अस्तित्‍वात होत्‍या. […]

डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग ५

१८९५ ते १८९९ यादरम्यान रॉस व मॅन्सन यांच्यामधील १७३ पत्रांच्या माध्यमातून झालेला संवाद मलेरियावरील संशोधनाचा महत्त्वपूर्ण ठेवा आहे. हजारो मैल एकमेकांपासून दूर असलेल्या या दोन संशोधकात पत्रांमधून संशोधनासंबंधीची अनुमाने, त्यावरील टिपणे, डासांची हाताने काढलेली चित्रे व रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतलेल्या काचपट्ट्या या सर्वांची देवाण-घेवाण होत असे. त्या काळात हे सर्व बाड पोहोचण्यास कमीत कमी चार आठवडे लागत, यावरून दोघांच्या चिकाटीची व जिद्दीची कल्पना येते. रॉस […]

रुद्रा – कादंबरी – भाग १३

‘आनंद टी सेंटर’ सारखा चहा, जगाच्या पाठीवर कोठेच मिळत नाही असे जसवंतचे व्यक्तिगत मत होते. पुडी लावून झाली ली तो हळूच येथे यायचा. आणि एक ‘कडक मिठ्ठी’ चहा ढोसायचा! गंजावर गोड खाल्लेकि माणूस लवकर हवेत तरंगतो, हे त्या मागचे छुपे तत्व होते. इतरांच्या चहात दीड चमच्या साखर टाकणारा भट्टिवाल कार्ट जसवंतच्या चहात तीन चमचे टाकत असे. नेहमीच्या गिऱ्हाईकाच्या […]

दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी

बाहुबली चित्रपटात देवसेनाची भूमिका करणारी अनुष्का ही रियल लाइफमध्ये मात्र खूपच ग्लॅमरस आहे. अनुष्का शेट्टी हे साऊथ सिने इंडस्ट्रीतील एक मोठं नाव असून तिकडे ती टॉपची हिरोईन आहे. इतकेच नाहीतर सिनेमासाठी पैसे घेण्याबाबतीतही ती साऊथमधील सर्व अभिनेत्रांच्या कितीतरी पुढे आहे. […]

शेवटचा राजयोगी गेला..

काल मनोहर पर्रीकर गेले. उभा देश हळहळला. ते ज्या पक्षाचे नेते होते, त्या पक्षाला पर्रीकरांचं जाणं म्हणजे ‘पक्षा’चं मोठं नुकसान झालं असं वाटणं अगदी सहाजिक आहे. ते ज्या पक्षांचे नव्हते, त्यांना ‘राजकारणा’चं मोठं नुकसान झाल्यासारखं वाटलं. त्याहीपेक्षा अचंबित करणारी गोष्ट म्हणजे, ज्यांचा राजकारणाशी फक्त निवडणुकांपुरताच संबंध येतो, अशा करोडो सामान्य लोकांना पर्रीकरांचं जाणं म्हणजे ‘देशा’चं नुकसान […]

मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग ७

समारोप – मराठे एक सत्ता म्‍हणूनच राहिले, त्‍यांचे भारतव्‍यापी साम्राज्‍य झाले नाही, ते दिल्‍लीपती झाले नाहीत, ही गोष्‍ट खरी आहे. ते नाकारण्‍यात अर्थ नाही. परंतु त्‍याची कारणे सैनिकी व आर्थिकही आहेत. त्‍याची कारणे त्‍या काळातील प्रमुख राजकारणाशी संबंधित आहेत. ‘मराठी’ मनोवृत्ती, ‘मराठी’ संस्‍कृती किंवा ‘मराठी’ परंपरा संकुचित व अल्‍पसंतुष्‍ट होती असे अजिबात दिसून येत नाही. […]

1 159 160 161 162 163 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..