नवीन लेखन...

शिवलीलामृतकार श्रीधर स्वामी

श्रीधरांचे घराणे आनंद संप्रदायाचे; परंतु संतांना आदर्श मानणाऱ्या श्रीधरांनी वारकरी संप्रदायाची जवळीक साधली आणि आपल्या मनातील भावना, विचार व्यक्त करण्यासाठी संतांची अभंग व ओवी ही अभिव्यक्तीची माध्यमे  वापरले.  त्यांचे ग्रंथ त्या काळात लोकमान्य झाले होतेच. पण आजही ती मनोभावे वाचली जातात..  […]

एक अविस्मरणीय प्रवास

एका अतिमहत्वाच्या कामासाठी गावी जायचे होते. मुळात गावावरून फोन आला त्यावेळी रात्रीचे साडेअकरा वाजले होते. तरीही मी ओळखीच्या ट्रॅव्हल्समध्ये “सांगली, मिरज, कोल्हापुरला जाणारी एखादी तरी गाडी आहे का?” म्हणून चौकशी केली. पण एकही नव्हती. मग या क्षणाला कशाने जायचे हा गहन प्रश्न होता. […]

पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी…

सध्याच्या फास्ट लाइफमध्ये बऱ्याच जणांना पोटाच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे, पण ह्याचे जर मूळ कारण शोधले तर बऱ्याचदा आपल्या चुकीच्या आणि अवेळी खाण्याच्या पद्धतीमुळे पोटाच्या समस्या ह्या जास्त प्रमाणात होतात. जर ह्यावर यशस्वीरीत्या मात कराची असेल तर प्रोबायोटिक्स पोटाचे आरोग्य आणि आकार चांगला ठेवण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. परंतु, म्हणून त्याचा अतिरेक करणे योग्य नाही. पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी दैनंदिन जीवनात करण्याच्या काही गोष्टी…. […]

नजरेचा बलात्कार

कुठुन कुठुन नजरा जातात शिरत राहतात अंग बघायला बायांनीही फँशन म्हणून ठेवलेले असतात पाठीवर हातावर कधी छातीवरही काही झरोके ब्लाॅउज अन साडीच्या मधला भागही शोधत राहते अन मोठाच बलात्कार करत असते नजर एकही अंग उघडं नसलेल्या अंगभर कपडे घातलेल्या बाईवर ब्रा वा इतर अंतर्वस्त्राचे किनार वा  काठ ठळक दिसत राहतात त्याला वरुन कपड्यावरुन…. तेव्हा ! — श्रीकांत पेटकर 

किर्तनी झोप

नियमित जाऊनी मंदिरी,  श्रवण करी तो किर्तन तन्मयतेनें ऐकत असतां,  जाई सदैव तेथे झोपून…१, एकाग्र करिता चित्त प्रभूसी,  निद्रेच्या तो आहारी जाई निघूनी जाती सर्व मंडळी,  एकटाच तो तेथे राही….२, पवित्रतेच्या वातावरणीं,  प्रभू नामाच्या लहरी फिरती झोपीं गेला कोपऱ्यांत तो,  परिणाम त्या त्यावरी करती….३, शांत असूनी निद्रीस्त इंद्रीये,  शोषूनी घेती त्या लहरी आनंदाचे वलय भोवती,  समाधान […]

जाब

“ब्रुटस दाउ टू, ब्रुटस दाउ टू” तो जिकडे जात होता तिकडे हेच ऐकत होता. तो कान बंद करीत होता तरी ते आवाज त्याच्या कानात घुमत होते. तो या आवाजापासून जितका दूर पळत होता तितका तो आवाज त्याचा पाठलाग करीत होता. रस्त्यावरच्या गर्दीत मिसळला तर रस्त्यावरच्या गोंधळातही तो आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता. तो दूर गुफेत जाउन लपला तर तिथेही आवाज त्याच्या मागे येत होता. […]

डॉ. अॅ‍ड्रीअन कॅन्‍ट्रोव्हिटझ्

डॉ. अॅ‍ड्रीअन कॅन्‍ट्रोव्हिटझ् दक्षिण आफ्रिकन हृदयशल्‍यविशारद डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड यांनी जगातील पहिली मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया केली. दुसरी मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया करण्‍याचा मान डॉ. अॅड्रीअन कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांच्‍याकडे जातो. ६ डिसेंबर १९६७ रोजी अमेरिकेतील न्‍यूयॉर्क मधील ‘मायमोनिडेस मेडिकल सेंटर’ येथे ही शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांनी हृदयशल्‍यचिकित्‍सेच्‍या क्षेत्रात अतिशय भरीव कामगिरी केली आहे. प्रस्‍तुत शस्‍त्रक्रिया हा त्‍यांच्‍या शिरपेचातील […]

ख्यातनाम लेखिका सरोजिनी शारंगपाणी

“आहुती’, “गुन्हेगारी आणि शासन’, “गुन्हेगारांचे जग’, “पुरुषप्रधान संस्कृती’, “दुर्दैवाशी दोन हात’ अशा अनेक पुस्तकांच्या लेखिका सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचे चिरंजीव श्रीनिवास शारंगपाणी यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी…   […]

डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग ४

लंडन येथून भारतात बोटीने येत असताना रॉस बोटीवरील प्रवासी , वाटेवरील बंदरांवर चे खलाशी यांचे रक्ताचे नमुने का चट्ट्यांवर घेऊन मायक्रोस्कोप खाली सतत न्याहाळत राही . डासांचे विच्छेदन आत्मसात करण्याकरिता प्रथम त्याने अनेक झुरळांवर विच्छेदनाचे प्रयोग केले. भारतात आल्यावर ताप असलेल्या अनेक रुग्णांचे रक्ताचे नमुने काचपट्टीवर घेऊन ते तपासण्याचा सपाटाच लावला. परंतु रॉसच्या या रक्ततपासणीच्या अट्टाहासापायी रुग्ण घाबरायला लागले. रॉसचे सह-अधिकारी या तापाचा […]

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग २ – अ

आपण भाषेच्‍या शुद्धपणाचा परकीय भाषेच्‍या संदर्भात विचार केला. आतां आपण त्‍याचा विचार लोकभाषेच्‍या दृष्‍टीकोनातून करूं या. त्‍यावरून पाहूं या, इंग्रजी भारतीय भाषांचं अस्तित्‍व नाहीसं करून टाकील, असा निष्‍कर्ष निघतो कां तें.  आपण आधी पाहिलंच आहे की जी लोकभाषा असते, ती टिकून राहते, कारण ती जनसामान्‍यांची भाषा असते. तिला प्रतिष्‍ठा असो वा नसो, पण तिचं अस्तित्‍व टिकून राहतं. […]

1 161 162 163 164 165 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..