नवीन लेखन...

तीन गुणाचे जीवन

तीन गुणांनीं युक्त असूं द्या,  तुमचे जीवन सारे जीवन यश पताका तुम्हीं,  फडकवित रहा रे असती सारे ईश्वरमय,  याच भूतला वरचे प्रथम मान द्या हो प्रभूला, कार्य समजून त्याचे आनंद घेऊनी संसारांचा,  लक्ष्य असावे जीवनीं निसर्गाचे हे चक्र फिरावे, विचार असूं द्या मनी दुसऱ्याचा बघूनी आनंद, दुप्पट होई आपला आयुष्यातील कांहीं भाग,  अर्पा तुम्हीं समाजाला तीन […]

दिलखुलास – प्रवीण दवणे

प्रवीण दवणे… वक्ते, साहित्यिक, मराठीचे अध्यापक आणि एक मनमोकळं व्यक्तिमत्त्व. जे त्याच्या छायाचित्रातून जाणवत राहते… पासष्टहून अधिक पुस्तकांसाठीचं लिखाण, अनेक कवितासंग्रह, नाटकांचं लिखाण, तब्बल सवाशेहून अधिक मराठी चित्रपटांसाठीची गीतरचना, अडीचशेहून अधिक कॅसेटस्साठी दोन हजांहून अधिक भावगीतं आणि भक्तिगीतांचं लिखाण, सतत दौऱयावर राहून दर्दी प्रेक्षकांची गर्दी खेचणाऱया कार्यक्रमांचा सूत्रधार आणि सुमारे चार दशकं मराठीचे खमके अध्यापक म्हणून […]

चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग १२

विद्यापीठाचा सारा परिसर माणसांनी नुसता फुलून आलेला दिसत होता . सारे वातावरण कसे भारल्यागत वाटत होते . कोंडाळे जमवून कोपऱ्या -कोपऱ्यात बोलत उभे असलेले लोक आणि जमलेले लोक कार्यक्रम केंव्हा सुरु होतोय याचीच वाट पहात होते . […]

हायकु

एक.. वाळली  पाते वावटळीशी नाते बोडके  झाड…. दोन लाट येणार नक्की  विचारणार घर  कोणाचे ? तिन उदास पाने भरकटत  वारा आनन्दी  गाणे….. — श्रीकांत पेटकर

मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग ६

१८व्‍या शतकातील मराठे दिल्‍लीस जाऊन पोचले परंतु दिल्‍लीचे अधिपती झाले नाहीत, ह्या गोष्‍टीचा विचार करतांना दिल्‍लीला धडक देणार्‍या व्‍यक्‍ती कोण होत्‍या, हे पुन्‍हा एकदा विचारात घेणे आवश्‍यक आहे. आधी हा उल्‍लेख आलाच आहे की, बाजीराव, सदाशिवराव भाऊ व महादजी या तिघांमधील एकही जण स्‍वतः राजा नव्‍हता, ते कुणा दुसर्‍याचे सेवक होते, अंकित होते. सर्व निर्णय स्‍वतः घेण्‍याचे स्‍वातंत्र्य त्‍यांना नव्‍हते. […]

मी महिलादिन साजरा केला

सकाळी रोजच्या प्रमाणे अाँफीसची तयारी केली पत्नीने चहा केला, डबा केला रोजप्रमाणे मी  ओफिसला ती घरी मुलींचा अभ्यास बघितला, शाळेसाठी तयारी केली परत अाणायला घाई केली रोजप्रमाणे मी घरी आलो तिने पाणी दिलं चहा केला रोजप्रमाणे महिलादिनानिमीत्त सोसायटीत कार्यक्रम आहे म्हणाली माझ्यासाठी जेवण तयार करुन ठेवलं ……….नंतरच ती गेली कार्यक्रमाला मी तिला शुभेच्छा दिल्या रोजसारखीच आजही […]

आपल्या हक्काचा दिव्यातील राक्षस

लहानपणी सर्वाना गोष्टी ऐकायला किंवा वाचायला आवडतात. गोष्टीमधून आपण एका नवीन दुनियेची सफर करून येतो. जसे आपण मोठे होतो, तसे आपण कामामध्ये अडकत जातो आणि लहानपणातील गोष्टीच्या दुनियेतून बाहेर पडून वास्तविक दुनियेत रमून जातो. […]

विश्व पसारा

विश्वामध्ये वावरतां भोंवती विश्व पसारा रमतो गमतो खेळतो जीवन घालवी सारा, संबंध येई हर गोष्टींचा, गोष्टी येथें अगणित प्रत्येक ती निर्माण करी आपलेच विश्व त्यांत जीव निर्जीव विखूरल्या वस्तू अनेक आगळ्या त्या परि ठरे एकाचीच  घटक, विश्वामध्येच विश्व असते राहून बघे विश्वांत समरस होता त्याच विश्वाशी प्रभूमय सारे होत डॉ. भगवान नागापूरकर 9004079850 bknagapurkar@gmail.com

रुद्रा – कादंबरी – भाग १२

कालच्या ‘राजयोग’ डिनरच्या वेळची राधाने दिलेली माहिती राघव पुन्हा पुन्हा आठवत होता.आणि त्या बरोबर खळखळून हसणारी सुंदर राधा पण नजरे समोरून हालत नव्हती! तरी त्याने आपले मन केस वर फोकस केले. तो मनोहर नेमका कोण होता? तो संतुकरावांना कशासाठी भेटायला गेला होता? त्या दोघात कसलेही साम्य नव्हते. […]

रात्र बहरली चंद्रप्रकाशे

रात्र बहरली चंद्रप्रकाशे, पाण्यावर तरंगती रजतकण, फांदी फांदी झुकुनी त्यावरी, धरते सावली रक्षण्या कणकण,-! अंधार प्रकाशी खेळे कसा, चंद्रमा ढगां–ढगांत विराजे, पानापानातून रजत नक्षी, सृष्टीवर रुपेरी‌ प्रकाश पसरे, कधी लपे सुधांशू हा, या मेघातून त्या मेघात, वातावरण जिवा वेड लावे, जादूच फैलावे प्रेमीयुगलांत,-! दूरवरीचे डोंगर बघती, संथ शांत पाणी कसे, कधी काळे कधी पांढरे, कधी म्हणावे […]

1 162 163 164 165 166 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..