ऊन पडले कोवळे
ऊन पडले कोवळे, धरणीवर तरंगत आले, प्रकाशाचे खेळ सारे, किरण हवे तसे रमले,–!!! आकाशाचा गोल घुमट, कसा तापून गेला, किमया कशी तेजाची, धरतीवर जमली पसरट,–!!! दुपारचे ऊन,मध्यान्हाचे, उष्ण उष्ण निखार, मित्रराज” तळपता उभा, रोपट्यांना फुटले धुमार,–!!! वाढत गेला किरणांचा गरिमा, झाडे सारी शोषती प्रकाश, जीवन कसे तरारले, हा निसर्गाचाच महिमा,–!!! वाढे दुपारचे ऊन, हळूहळू कलंडू लागे, […]