नवीन लेखन...

रानपाखरं

येत्या काही वर्षात चिमणी सारखा पक्षी जो आपल्या अवतीभवती सतत दिसायचा तो आजकाल माणसानी लावलेल्या नवीन शोधांमूळे दिसेनासा झालाय. यासारखी अनेक पाखरं जी आपल्याला माहीती ही नाहीत. यांच्या जाती नष्ट झाल्या तरी समजलेही नसेल किंवा समजणार ही नाही. मग अशावेळी आपण मानव जातीने यांचे संवर्धन करणे खरचं खूप गरजेचे आहे. नाहीतर निसर्गाचा ड़ोलारा कोलमड़तोच आहे. तो संपायला वेळ ही नाही लागणार . […]

डॉ. नॉर्मन शुमवे

हृदय-प्रत्‍यारोपणाच्‍या इतिहासात डॉ. नॉर्मन शुमवे यांचे नाव सोनेरी अक्षरांत लिहिलेले आहे. त्‍यांनी अमेरिकेतील स्‍टॅनफोर्ड येथील पहिले हृदय-प्रत्‍यारोपण केले. त्‍याआधी बराच काळ ते यावर काम करीत होते. या विषयावर पथदर्शी संशोधन व कार्य करण्‍याचे श्रेय शूमवे यांच्‍याकडे जाते. डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड यांनी शुमवे यांच्‍याकडे हृदय-प्रत्‍यारोपणाचे प्रशिक्षण घेतले असे म्‍हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. मानवी हृदय-प्रत्‍यारोपणाची […]

आकाशातील कापूस

कपाशीचे  ढिग अगणित    विखुरले  दिसती आकाशीं मानव येथें उघडा  असूनी    वस्त्र  अपुरें दिसे अंगाशी   ।।१।। कोठे आहे कापड गिरणी     वस्त्र जेथें बनत असें दयावान तूं मालक असतां    त्रोटक कापड निघे कसे   ।।२।। पाठव तूं तो वस्त्रांचा कोठा    लाज  राखण्या मानवाची गरिब बिचारा विवस्त्र तो    किव करावी वाटे त्याची   ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

वस्तूतील आनंद

आनंद दडला वस्तूमध्यें,  सुप्त अशा त्या स्थितीत असे सहवासाने आकर्षण ते,  होऊन बाहेरी येत दिसे….१, प्रेम वाटते हर वस्तूचे,  केवळ त्यातील आनंदाने बाहेर येता नाते जमते, आपुलकीचे पडून बंधने…२, तोच लूटावा आनंद सदैव,  अंवती भंवती वस्तूतला दूर न जाता दिसले तुम्हां, आनंदच भोवती जमला…३, जेव्हा कुणीतरी म्हणती,  ईश्वर आहे अणू रेणूत वस्तूमधील आनंद बघतां  हेच तत्त्व […]

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग १ – ब

तुम्‍हाला नवल वाटेल की फक्‍त फारसीतूनच भारतीय भाषांमध्‍ये शब्‍द आले आहेत असं नाहीं, तर संस्‍कृतमधूनही फारसीत अनेक शब्‍द गेलेले आहेत. या विषयावरील श्री. राजेश कोचर यांचे लेख माझ्या वाचनात आले आहेत. मुंबईचे श्री. प्रकाश वैद्य यांनीही मौलिक संशोधन केलं आहे (आणि थोडंफार मी स्‍वतःसुद्धां ). […]

लाखात अशी देखणी – सुरेखा पुणेकर

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर… खास लावणीचा शृंगार, नखरे… कॅमेऱयाने टिपलेल्या तिच्या अदा… कारभारी दमानं’, ‘या रावजी, तुम्ही बसा भावजी’, ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’, ‘झाल्या तिन्हीसांजा’ अशा अनेक लावण्यांनी अवघ्या महाराष्ट्रावरच नव्हे तर सातासमुद्रापार संपूर्ण जगावरही भुरळ पाडली. महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार म्हणून ओळखली जाणारी लावणी ही केवळ नृत्यकलेतून सादर न करता ती आपल्या अदाकारीने […]

चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग १०

सरांच्या ओळखीने चंदरला एका डॉक्टरकडे काम करण्याची संधी मिळाली .रोज चार तास काम करावे लागेल “, या अटीवर चंदर या कामावर हजर झाला . आल्या-गेल्याची नोंद ठेवणे , पेशंटची नोंद ठेवणे , त्यांची बिले तयार करणे”, अशा स्वरूपाचे काम “,हे जास्त जिकीरीचे काम नाही या नव्या कामातून जे पैसे मिळतील त्यातून तुझा इतर खर्च भागू शकेल “, गुरुजींची हे सांगणे. […]

तो माझा कृष्णसखा

निळ्या जळी, काष्ठी, पाषाणी, मज मेघ:श्याम दिसे, ऐहिक जीवनी वावरताना, रंग निळसर भासत असे,–!! निळा काळा शाम तो, वाजवी मधुर बासरी, जिथे असेन तिथे मी, हरवून बसते परोपरी,–!!! राधिका मी त्याची, तो माझा कृष्णसखा, जिथे जाईन तिथे तो, बनत असे पाठीराखा,–!!! नावेत बसुनी चालले , या तीरावरून त्या तीरी, यमुनाही डचमळे सारखी, माझ्यासारखी उलघाल उरी,–!! मधुसूदनाचे […]

नारायण टिनपट्या

लहानपणी माझा आजा म्हणजे माझा बा सांगायचा . नंतर आई सांगायची ,नारायण टिनपट्याबद्दल .’टिनपट्या ‘ या विचित्र नावानं उत्सुकता वाढवली होती . शालेय जीवन …कॉलेजमुळे हा विषय मागे पडला .जरा मोठा झालॊ . नोकरीतून सुट्टीच्या काळात शेगाव बु ,म्हणजे माझ्या गावी गेलो की आई नातवंडाना कथा सांगायच्या वेळी ……आम्ही तिला टिनपट्याबद्दल सांगायला आग्रह करायचो . […]

प्रभू नामस्मरण

नामघ्या हो तुम्ही, प्रभूचे सतत । नामस्मरण ते, अशू द्या मुखांत ।।१।। काय सांगावी मी, नामाची थोरवी । दगडही जेथे, तरंगून जाई ।।२।। राम नामामध्ये, प्रभुचा संचार । बनून कवच, रक्षती शरिर ।।३।। नामाची लयता, मन गुंतवून । एकहोता चित्त, जाई आनंदून ।।४।। अंतीम ते ध्येय, ईश समर्पण । नामानी साधती, प्रभू सर्वजण ।।५।। डॉ. भगवान […]

1 167 168 169 170 171 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..