मेहनती… डॅशिंग – संतोष जुवेकर
मराठी सिने इंडस्ट्रीत गेल्या चार-पाच वर्षांत आमूलाग्र बदल पाहायला मिळालेत. मराठी कलाकार अपडेट झालाय, त्याचा कॉस्च्यूम सेन्स वाढलाय, त्याचं फॅशन स्टेटमेंट बदललंय अशी वाक्यं आपण या काही वर्षांत नेहमी ऐकतो. या इंडस्ट्रीचा चेहरामोहरा अशा पद्धतीने बदलायला लावणारी काही मोजकी तरुण नावं कारणीभूत ठरली आहेत. या तरुणांच्या यादीत संतोष जुवेकरचा क्रमांक वरच्या यादीत लागेल. […]