नवीन लेखन...

आपल्या आयुष्यात पाण्याचे काय महत्व आहे

शरीरातील आम्लाचा प्रभाव कमी करण्यासाठी दिवसभरात चहा किंवा कॉफीचे सेवन कमी करून जास्तीत जास्त पाणी पिण्यावर भर देणे, शरीरासाठी केव्हाही उपयुक्त ठरते. दिवसभरात कुठलेही कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा पाणी पिण्यावर आपण भर देणे गरजेचे आहे, ज्यामुळे आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होईल. […]

कविते-बिवितेसाठी?

घर -दार ऑफिस- बिफीस पोरं-सोरं लोकल -बिकल रीक्षा -बिक्षा रोज दिवसभर जा- ये पुन्हा तसंच ये -जा लोकल- बिकल परत -फिरत घर -बार जेवण- खावण जीवन -बिवन चालत राहतं वेळ कुठे कविते-बिवितेसाठी? ती तर सतत–सोबत पाठी- पाठी मुखी -ओठी/// # कौशल श्रीकांत पेटकर ९७६९२१३९१३ 

आ ई

सायंकाळची वेळ होती . आई रोजच्यासारखी घरातील कामं करीत होती . रविवार असल्यानं बाबा बाहेरगावी काही कामानिमित्त गेले होते . दिवसभर निवांतपणे ती तिची कामे करत होती . मुलांना आज खेळायला मुभा होती .पण झोपण्यापूर्वी दोन तास तरी अभ्यास करून घ्यावा असा आईचा नेहमीची शिस्त होती . परीक्षाही जवळ आlल्या होत्या . तिने मुलांना हाक मारली […]

सर्जिकल स्ट्राईक २

दहशतवादी हल्ला झाला कि केवळ निषेधाच रडगाणं गाणारा भारत असा काही पवित्रा घेईल असे पाकिस्तनाला स्वप्नातही वाटलं नसेल! त्यामुळेच त्याची आता धांदल उडाली आहे. भारताच्या कोणत्याही हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यास पाकी लष्कर सज्ज असल्याच्या वलग्ना पाकचे लष्करप्रमुख करत असले तरी वायुदलाच्या नुसत्या ट्रेलरने पाकची भंबेरी उडाली आहे. […]

चांगुलपणाचा अनुभव

जगात चांगुलपणा ही आहे . हे कळले.. पोलीस तसेच तो टँक्सीवाला यांच्यामुळे.. नेहमी लक्षात राहील असा होता हा अनुभव. […]

सबुरीचा सल्ला कशाला, महाशय ?

आपण जोवर सबुरीनें घेत आहोत, तोवर दहशतवादी ‘मऊ लागलें म्हणून कोपरानें खणणार’च ! . पण जर त्यांना दिसलें की आपण रिटॅलिएट करायला दृढसंकल्प आहोत, तर तें मोठें डिटरंट ठरेल. अशा वेळी, हा पत्रकार सबुरीनें घ्यायला सांगतो, हेंच अनाकलनीय आहे ! […]

प्रत्येक बाबतीत राजकारण : अरे, काय चाललंय् काय !

महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांनी असें म्हटलें आहे की ते पूर्वी ‘संघा’चे स्वयंसेवक होते. या कारणावरून म्हणे, विरोधी पक्ष त्यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणार आहे. अहो, बहिष्कार टाकायचाच असेल तर ज़रा चांगलें कारण तरी शोधा ! […]

एक झाड

एक झाड सारखं माझ्या स्वप्नांत येत राहतं अक्षरांनी लगडलेलं मी वेचतो,मी तोडतो मी जमवतो खुप अक्षरे आणि बनवतो निरनिराळे शब्द त्यांचेपासून माळेसारखी ओवून वाचकासाठी ठेवतो काही माझ्यासाठीही….. कुणी म्हणतात याला कविता कुणी गझल आणि कुणी काहीही! — श्रीकांत पेटकर

मराठी साहित्य विश्वात वादळ निर्माण करणारे साहित्यिक भाऊ पाध्ये

भाऊ पाध्ये यांचे लेखन थेट वास्तवाला भिडणारे असे. मुंबईतील संक्रमणकाळ त्यांच्या लेखणीने नेमकेपणाने व बारकाव्यानिशी टिपला होता. पाध्येंनी मुंबईचे उघडे नागडे विश्व जसे आहे तसे मांडले. कुठलाही निष्कर्ष काढण्याच्या भानगडीत ते पडले नाही. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात मुंबईत व एकंदरीत शहराच्या आरशात पाहिलेले, अनुभवलेले, मनावर कोरले गेलेले प्रसंग, घटना अभिव्यक्त केल्या आहेत. […]

जगाचा निरोप

काळ येतां वृद्धपणाचा,  विरक्तींची येई भावना । निरोप घेण्या जगताचा,  तयार करीत असे मना  ।।१।। वेड्यापरी आकर्षण होते,  सर्व जगातील वस्तूंवरी । नाशवंत त्या, माहित असूनी,  प्रेम करितो जीवन भरी ।।२।। जीवनांतील ढळत्या वेळीं,  जेव्हां वळूनी बघतो मागें । मृगजळासाठीं धावत होतो,  जाणून घेण्या सुखाची अंगे ।।३।। प्रयत्न केले जरी बहूत,   हातीं न लागे काहीं । […]

1 175 176 177 178 179 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..