बेताल स्वछंदीपणा
काढूनी झाडाच्या सालींचा आडोसा घेतला ज्या कुणीं स्वांतंत्र्याच्या कल्पनेला बंधन पडले त्या क्षणीं ।।१।। नग्नपणें फिरत होता श्र्वानासारखा चोहींकडे सुसंस्कृतीची जाण येतां स्वच्छंदाला बाधा पडे ।।२।। स्वतंत्र असूनी देखील पडते परिघ भोवती जीवन जगण्या करितां बंधने ती कांहीं लागती ।।३।। स्वांतत्र्याची तुमची व्याप्ती असावी दूजांना जाणूनी दिव्य करण्याच्या ईर्षेने संस्कृतीस होइल हानी ।।४।। ओंगळपणाचे […]