नवीन लेखन...

माझा चड्डीयार – भाग- २

 हीच डॉ. मारुती शंकरराव अतकरे व डॉ. भगवान केशवराव नागापूरकर  यांच्या मित्रत्व रोपणाची प्रथम पायरी. जी पुढे पुढे जात समांन्तर चालत गेली.  आज वयाची पंचाहत्तरी पुर्ण करीत पुढे जात आहे. वयानी जरी शारिरीक दुर्बलता दाखवण्यास सुरवात केली असली,  तरी आमची मने आजही टवटवीत आहेत. […]

केवढ्या चालल्या हालचाली

केवढ्या चालल्या हालचाली तुझ्या सांगते खुणवते देहबोली तुझ्या // मोहवीते तुझे हसणे लाघवी ओळखीच्या मला घालमेली तुझ्या // वाट पाहत उगा भटकलो त्या स्थळी भेटलो आज त्या पानवेलीं तुझ्या // मागुनी येऊनी हात नयनापुढे आठवे मागच्या बोलचाली तुझ्या// दिसते सारखी ‘कौशला ‘ का बरे ? स्फुरते काव्य……. ना काळवेळा तुझ्या//

गोड चोरी

रविवारला विदर्भ एक्सप्रेसने नागपुरवरुन कल्याणसाठी यायला निघालो. नेहमीच खिडकीतुन कितीदा बाहेर बघत राहायचं. तसा पाउसही नव्हता.. बाहेरचं दृश्य बघण्यासाठी….! […]

जन्मापूर्वी चाऱ्याची योजना

योजना करी चाऱ्याची, मुख देण्याचे आधी, तुझ्या दयेची किमया, कळली न कुणा कधीं….१, बदल करूनी शरिरी, मातृत्वाचे भरतो रंग, क्षिराचा देई साठा, पुलकित करूनी अंग…२, सदैव तयार राहूनी, दाना देई भूमाता, कुणी न उपाशी राही, काळजी घेई विधाता….३, जन्म देवूनी साऱ्यांना, पोषण तोच करितो अनंत उपकार करूनी, ऋणी आम्हा ठेवतो…४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

बघते नुसती हसते नुसती

बघते नुसती हसते नुसती फसवत फसवत फसते नुसती ! लाडिक चालणं लाडिक बोलणं खुळ ही लावत असते नुसती ! बंदच डोळे उघडे डोळे डोळ्यापूढे दिसते नुसती ! सुचवत काही सांगत काही काव्यातहि असते नुसती ! असते छानच नसतानाही विचारातच असते नुसती ! — श्रीकांत पेटकर

मराठी लोकांनी खेकड्याची वृत्ती सोडावी ……..!

पानिपत चा आणि १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातला पराजय हा शेवटला ठरला पाहिजे .आता देशाची सूत्र महाराष्ट्राच्या हाती देवून तर पहा .न भूतो न भविष्यती अशी प्रगती हा महाराष्ट्र देशा साठी घडवून आणेल. […]

अखेरचे येवून जा एकदा

निरोप मिळता कुठुन दुरुन धावत ये एकदा गर्दी जमेल पण गर्दीत मिसळून घे एकदा / तयारी सुरु असेल शोकाकुल अंतिम यात्रेची रडतील जीवलग त्यात मिसळ रडणे तुझे एकदा ! कुसकट नजरा तुझ्याकडे वळतील वारंवार दुर्लक्ष तिकडे करुनी शोक कर जाहीर एकदा ! अनेक असतील तरीही बिनधास्त रडुन घे तू बोलणे होणारच नाही, पण पाहुन घे मला एकदा! झोपलो चितेवर दुरुनच चोरुन पाहुन घे जातील सगळे ,थांबुन घे माझेसाठी जरा एकदा ! शेवटीचे भेट म्हणूनी काय द्यावे समजेना मला मुठभर राख ऊचलूनी घे, तीच आठवण एकदा! जा आता वेळ झाला ,किती थांबशील वेडे मलाही वाटेल उठुन सावरावे, अखेरचे एकदा! — श्रीकांत पेटकर 

लढाईस लागा

जवळ वेळ आली ……तयारीस लागा जवळ वेळ आली ……विलासास त्यागा/ फितूर दिसती येथले लोक छूपे जवळ वेळ आली…… लढाईस जागा / कल्लोळ कसला अन चर्चा या कशाला जवळ वेळ आली…… शहाणेच वागा / बंधुत्वाचं खूपच फसवं नातं चाले जवळ वेळ  आली….. तपासाच धागा / निर्णयात क्षण दवळावा कशाला जवळ वेळ आली…. कशालाच त्रागा / @कौशल(श्रीकांत पेटकर ) २२/ […]

‘अँटी-नॅशनल’ वरुन पत्रकारांच्या आक्रस्ताळेपणाचा कहर..

खरा प्रश्न आहे तो, सचिन व सुनील यांच्या स्टेटमेंटस् च्या योग्यायोग्यतेचा. परंतु, पत्रकार ( किंवा, भूतपूर्व पत्रकार) आशुतोष यानें विनाकरण त्याला वेगळाच रंग देऊन आक्रस्ताळेपणा केला. तसा तो आक्रस्ताळाच आहे. पत्रकार म्हणून तो एका टी.व्ही. चॅनेलशी संबंधित होता, आणि मुलाखती घेत असे, तेव्हांही त्याची पत्रकारिता आक्रस्ताळीच होती . नंतर आम आदमी पार्टीचा स्पोक्समन म्हणून तो मुलाखती देत असे, तेव्हांही तो आक्रस्ताळाच होता. त्यामुळे कालच्या चर्चेत तो एक सहभागी पाहुणा म्हणून आक्रस्ताळेपणानें बोलला तर त्याचें नवल वाटायला नको. […]

सूड वलय

उत्साहाने आला होता,  मुंबई बघण्याकरिता रम्य स्थळांना भेट देणे,  ही योजना मनी आखता मान्य नव्हती त्याची योजना,  नियतीच्या चाकोरीला पाकीट पळवूनी त्याचे,  घाला कुणीतरी घातला, धन जाता हाता मधले,  योजना ती बारगळली अवचित त्या घटनेने,  निराशा तेथे पसरली, जात असता सरळ मार्गी,  दुष्टपणाला बळी गेला समाजाला धडा शिकवण्या,  सूडाने तो पेटून गेला, वाम मार्गी जावून त्याने, […]

1 178 179 180 181 182 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..