नवीन लेखन...

शामल शामल संध्याकाळी

शामल शामल संध्याकाळी, पुन्हा सगळे गुंतवीत धागे, प्रीत जडे कशी अनुरागी, जसे घडले तेव्हा मागे, –!!! एकमेका अनुरक्त होता, जीव थोडाथोडा होई, प्रीत जुळता रेशमी ती, परत एकदा भेटू दोघे,–!!! पापण्यांची थरथर अगदी, तारुण्य किती अलवार, सावल्यांच्या साक्षीने तो, मिलाफही सुकुमार, –!!! हात गुंफता हातामध्ये, मजेची ती सफर करू, प्रेम प्रीती कोमलांगी, हळूच कशी उरी धरू,–!!! […]

गुरुबोध मात्र विसरू नकोस….

रोज थोडे तरी कार्य केल्यावाचून राहू नकोस, ब्रह्यांडनायक पहातायेत तुला गुरूबोध मात्र विसरु नकोस…. तुझ्या वाटेत आडवे खूप येतीलही… पायात पाय घालून पाडवतीलही…. घाबरून त्यांना तू तुझं उभे राहणं सोडू नकोस.. सद्गुरू पहातायेत तुला गुरूबोध मात्र विसरू नकोस तुझं कौतुक प्रत्येकाला इथं रुचेलच असं नाही… कौतुकासाठी तुझं नाव सुचेलच असंही नाही… तू मात्र इतरांचं कौतुक करण्यास […]

सूर संस्काराचा – डॉ. वरदा गोडबोले

डॉ. वरदा गोडबोले किराणा गायन शैलीतील एक आश्वासक नाव. सुरांच्या वाटेवर तिची वाटचाल सुरू आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याची संस्कारसंपन्न गायकी अंगी बाळगलेल्या गायक आणि गायिकांची यादी फार तगडी आहे. किराणा घराण्याचे उस्ताद करीम खां यांच्या तालमीत के. डी. जावकर, सवाई गंधर्व आणि बाळकृष्ण बुवा कपिलेश्वरी हे दिग्गज गायक तयार झाले. पुढे सवाई गंधर्व यांच्याकडे […]

आहे मनोहर तरी.. (भाग तिसरा)

पुढच्या काही महिन्यात भाजप, भाजपचे वाचाळ नेते, भाजपशी संबंधीत संघटना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सोशल मिडियावरील भाजप भक्त यांना अावर घातलेला दिसला नाही, तर मग ‘नोटा’ च्या प्रमाणात वाढ होणार हे निश्चित..! ह्याचे परिणाम अर्थातच भाजपलाच भोगावे लागणार, कारण ‘नोटा’चा पर्याय वापरणारे बहुसंख्य भाजपचे मतदार आहेत आणि ते ‘नोटा’ वापरून आपला निषेध नोंदवतायत, असं मी माझ्यावरून समजतो. […]

जीवन म्हणती याला

त्याची एकता करूण कहाणी,  डोळे भरून आले पाणी हृदय येता उंचबळूनी,  निराश झाले मन आघात होता त्याच्या जीवनी,  तो तर नव्हता माझा कुणी तरी का आले प्रेम दाटूनी,  उमजेना काही दु:ख दुजाचे समोर आले,  मनास ज्याने कंपीत केले दोन जीवांच्या हृदयामधले,  अदृष्य हे धागे मानव धर्म एक बिजाचा,  वाढत गेला गुंता त्याचा ओढत असता धागा टोकाचा, […]

अखेरचे येवून जा एकदा

निरोप मिळता कुठुन दुरुन धावत ये एकदा गर्दी जमेल पण गर्दीत मिसळून घे एकदा / तयारी सुरु असेल शोकाकुल अंतिम यात्रेची रडतील जीवलग त्यात मिसळ रडणे तुझे एकदा ! कुसकट नजरा तुझ्याकडे वळतील वारंवार दुर्लक्ष तिकडे करुनी शोक कर जाहीर एकदा ! अनेक असतील तरीही बिनधास्त रडुन घे तू बोलणे होणारच नाही, पण पाहुन घे मला एकदा! झोपलो चितेवर दुरुनच चोरुन पाहुन घे जातील सगळे ,थांबुन घे माझेसाठी जरा एकदा ! शेवटीचे भेट म्हणूनी काय द्यावे समजेना मला मुठभर राख ऊचलूनी घे, तीच आठवण एकदा! जा आता वेळ झाला ,किती थांबशील वेडे मलाही वाटेल उठुन सावरावे, अखेरचे एकदा! @ “कौशल” श्रीकांत बापूराव पेटकर, कल

खुळ्ळूक खुळ्ळूक गाडी

गाडीवानदादा बैलं तुझी लय भारी, खुळ्ळूक खुळ्ळूक गाडीत , केव्हाच निघते तुझी स्वारी, सर्जा राजाची जोडी, भरदार कशी उंचीपुरी, घुंगूरमाळा डुलवीत डुलवीत दोघांची जोडी चाले न्यारी, सर्जा राजा वाऱ्यागत पळती, सुसाट सो सो अगदी धावती, जसे विमान जाई गगनांतरी, चाबूक” ना मुळी वापरशी, कांसरा”” हलके जरा ओढशी असे करून दिशा दाखविशी, कसब, ममता केवढी थोरली,–? गाडीवान […]

झापडं काढा सुनिल, सचिन

सुनील आणि सचिन, सभ्य गृहस्थहो, तुमची झापडं काढा, जागे व्हा, जनप्रक्षोभ ज़रा समजून घ्या , आणि पाकिस्तानशी क्रीडासंबंध तोडायला अनुकूलता दाखवा. नाहींतरी, सरकार, ‘काय करावें’ ती कृती तुम्हांला विचारून थोडीच अमलात आणणार आहे ? तुमच्या चुकीच्या स्टँडबद्दल इलेक्ट्रॉनिक मीडिया तुम्हांला नांवें ठेवतच आहेत. तरी , जनक्षोभ तुमच्या विरुद्ध जाण्यांआधी तुमचा स्टँड बदला, लवकर बदला, नाहींतर उशीर झालेला असेल . […]

रुद्रा – कादंबरी – भाग ६

मेसेज मध्ये केवळ पाच सेकंदाची व्हिडीओ क्लिप होती! रुद्राला दरदरून घाम आला! तो खून करताना त्याने संतुकरावांच्या तोंडावर दाबलेल्या हाताची ती क्लिप होती! त्यात फक्त त्याचा चेहरा दिसत नव्हता. नसता ती क्लिप त्याला फासावर चढवण्यास पुरेशी होती!  […]

टीव्हीच्या आठवणी…

चॅनेल्स नव्हती,रिमोट नव्हते त्यामुळे जे काही समोर सुरू आहे, ते भक्तिभावाने पाहत सगळं कुटुंब रंगून जायचं…त्यातल्या त्यात टीव्हीचा आवाज कमीजास्त करणं हीच काय ती हालचाल.. तेव्हाचा रिमोट हा घरातील शेंडेफळ असे.. […]

1 179 180 181 182 183 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..