ईश्वरी इच्छेनेच
वळून बघतां गतकाळाला, चकीत झाले मन । घटना घडल्या जीवनामध्यें, राही त्यांची आठवण ।। चालत असतां पाऊल वाट, जीवन रेषे वरची । स्वप्न रंगवी मनांत तेंव्हा, भावी आयुष्याची ।। परिस्थितीच्या भोवऱ्यामध्यें, पुरता गुरफटलो । फिरणाऱ्या त्या वर्तुळातूनी, बाहेर येवूं न शकलो ।। कल्पिले होते नियतीनें, तेच घडविले तिनें । भंग पावले स्वप्नचि सारे, तिच्याच लहरीनें ।। […]