नवीन लेखन...

माझी मैना गावावर राहिली !

महाराष्ट्र आणि म्हैसूर (म्हणजे आताचे कर्नाटक) यामधील न सुटलेला सीमाप्रश्न अजूनही कायम आहे. शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी याच मराठी माणसाच्या दुख-या शिरेवर बोट ठेवून ” माझी मैना गावावर राहिली हे अजरामर गीत लिहिले होते .जोपर्यंत बेळगाव कारवर निपाणी आणि उंबरगाव महाराष्ट्रात सामील होत नाही तो पर्यंत शाहिरांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही .. […]

समत्व बुद्धी

एका टोंकावरती जातां,  शांत न राही झोका तेथें विलंब न करता क्षणाचा,  जायी दुजा टोका वरती, जीवनांतील झोके देखील,  असेच सदैव फिरताती बऱ्या वाईटातील अंतर,  नेहमी चालत असती समाधान ते मिळत नसे,  जेव्हां बघता तुम्हीं भोग त्यांत देखील निराशा येते,  मनीं ठरविता जेव्हां योग जवळपणाच्या नात्यामध्यें   दुरत्वाचे अंकूर फूटते दूर असता कुणी तरी,  जवळ करावे वाटते, […]

ओंजळभर मोती

ओंजळभर मोती, आई तुझ्यासाठी, कष्टलीस ग बाई, सारखी संसारासाठी,–!!! ओंजळभर सोनचाफा, आई तुझ्यासाठी, पोळल्या जिवाला गारवा, मिळेल तुझ्यापाशी,–!!! ओंजळभर मोगरा, आई तुझ्यासाठी, सौंदर्यातील सुगंधाने, आत्मिक दुवा साधण्यासाठी,-!! ओंजळभर चंदन, आई तुझ्यासाठी, उगाळून झिजलीस, आमुच्या भल्यासाठी,–!!! ओंजळभर मरवा, आई तुझ्यासाठी, सारखी फुलत राहशी, तूच आमुच्यासाठी,–!!! ओंजळभर अश्रू, आई तुझ्यासाठी, किती झालीस रिक्ती, देणीघेणीअजून चालती,–!!! हिमगौरी कर्वे.©

निळ्या मखमली ढगांवरती

निळ्या मखमली ढगांवरती, चला स्वार होऊ,— डोळे भरून ही दुनिया, पहात पाहत पुढे जाऊ,— थंडगार हवेत त्या, मेघांचे ओढून शेले, हळूच दबकत, लपतछपत, सूर्यापासून दूर होऊ,— उबदार त्या वातावरणी, अलगद खेळत राहू, मस्तमौला जगत जगत, वरून डोकावून पाहू,— खाली दिसती पर्वतरांगा, नद्या कशा वाहती, पर्वताच्या कुशीत कसे, धबधबे खाली ओसंडती,— थेंबांची नाजूक नक्षी, कोसळते वरून खाली, […]

मुक्त अनुवाद

मागेन हिशोब तुझ्याकडे, कधीतरी माझ्या एकटेपणाचा, सुरकुतलेली पुस्तकातली फुले, देतील साक्ष; नि सांगतील तुलाच , आपल्या ओठांवर, बघ ते गुलाब ठेवून, सुगंधित निघेल ग अत्तर, सुरकुतलेल्या पाकळ्यांमधून , आपल्या प्रेमाचं, त्या विफल प्रेमाचा, करून टाक सौदा, प्रेमातल्या आणाभाकांचाच व्यवहार*,—!!! हिमगौरी कर्वे.©

मराठी कवयित्री, लेखिका, नाटककार पद्मा गोळे

पद्मा गोळे या मराठी कवयित्री ‘पद्मा’ ह्या नावाने काव्यलेखन करत असत. त्यांचा जन्म १० जुलै १९१३ रोजी झाला. त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रीतिपथावर हा १९४७ साली प्रकाशित झाला. कविता संग्रहांशिवाय त्यांनी रायगडावरील एक रात्र, स्वप्न, नवी जाणीव या नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली वाळवंटातील वाट नावाची कादंबरीही प्रकाशित झाली. याशिवाय स्वप्न (१९५५), समिधा (१९४७), नीहार (१९५४), स्वप्नजा (१९६२) व आकाशवेडी(१९६८) […]

संगीत समीक्षक आणि लेखक दत्ता मारुलकर

आता ती मैफलही सुनीसुनी! बऱ्याच वर्षांपूर्वीची संध्याकाळ. शास्त्रीय संगीताच्या एका मैफलीत एक उंच, सावळे व्यक्तिमत्व दाखल झाले. चालणे, डौल ‘नमवी पहा भूमी हा चालताना’ असे. कुतूहल चाळवले ते मैफलीत दाद देण्याची रीत पाहून. लहान-सहान जागांनाही जाणकारीने पण हळुवारपणे तर कधी ‘क्या बात है.’ अशी मोकळी दाद. मैफल संपल्यावर जेवणाआधीच्या ‘मैफली’त ओळख झाली- मी दत्ता मारुलकर! त्यांचे […]

बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस

पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे समजले जात. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा येथे झाला. नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या २० व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे […]

देव ‘जिप्सी’द्वारी भेटला..

तो मेसेज होता मराठीतले प्रसिद्ध लेखक श्री. वसंत वसंत लिमये यांचा. ‘लाॅक ग्रिफिन’ आणि ‘विश्वस्त’ ह्या दोन रहस्य-थ्रिलर कादंबऱ्यांतून चोखंदळ मराठी वाचकांच्या घरात आणि मनात पोहेचलेले श्री. वसंत वसंत लिमये यांची माझी भेट झाली. अगदी ठरवून झाली. […]

कंपन्या खालसा करु, प्रजेचं राज्य आणू..

संस्थानं साम-दाम-दंड-भेदाने मोडीत काढून सरदार वल्लभभाई पटेलांनी एकसंघ भारत उभा केला होता. आता तशीच वेळ पुन्हा आली आहे, परंतु सरदार आता नाहीत. सरदारांचा जगातला सर्वात उंच पुतळा मात्र आपल्याला प्रेरणा देत उभा आहे. त्या पुतळ्याला स्मरुन आपण देशात उगम पावलेल्या राजकीय प्रायव्हेट लिमिटेड कंपन्याचं त्यांच्यासाठीच चालवलेलं त्यांचं राज्य खालसा करून, खऱ्या अर्थाने आपल्या देशावर प्रजेने प्रजेसाठी चालवलेलं प्रजेचं राज्य आणण्याचा निर्धार करुया. आपणच सरदार बनूया..!! […]

1 185 186 187 188 189 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..