सैनिकांवर हृदयशस्त्रक्रिया करणारे डॉ. ड्वाईट हार्केन
दुसर्या महायुद्धाच्या काळात बॉम्बस्फोटात श्रापलेनचे तुकडे हृदयात घुसून सैनिक जखमी होत व त्यातच त्यांना प्राण गमवावे लागत. डॉ. हार्केन यांनी अशा सैनिकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले. त्यांनी सुमारे १३० सैनिकांवर अशा प्रकारे शस्त्रक्रिया केल्या. यातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे ह्या सर्व १३० शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. यामुळे त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. […]