नवीन लेखन...

मदमस्त तारुण्य बहर

मदमस्त तारुण्य बहर, पाहून कसा मी, जागच्या जागी थिजलो, दया कर जराशी, तुला पाहुनी अचानक, बर्फासारखा विरघळलो,–!!! सुवर्णचंपकी कांती तुझी, चाफेकळीगत नाक, भिरभिरणारे टपोरे नेत्र, अन लाल कपोती गाल, –!!! भुरभुरणारे केस उडती, कसे वाऱ्यावरती, जसा सुगंधच होतो, येणाऱ्या झुळकेवर स्वार,–!!! धडधडणारे उरोज पाहून, पुरता मी ढांसळलो, लटपट चालीने त्या, एकदम गांगरुन गेलो,–!!! शब्द “मंजुळ” किती, […]

फेसबुकचा वाढदिवस

इंटरनेटच्या प्रसारामुळे ‘हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आली असली तरी या जगाला एका कुटुंबाप्रमाणे बनवण्याचे श्रेय जाते ते फेसबुकला. या सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करणा-यांची संख्या १८० कोटींहून अधिक असल्याने फेसुबक म्हणजे १८० कोटींहून अधिक लोकांचे एक कुटुंबच बनले आहे. […]

भीमसेन जोशी

भीमसेन जोशी म्हणजे ‘गायनाचं विद्यापीठ होते. भीमसेन म्हणजे कांही लेखक किंवा भाष्यकार नव्हे, पण भीमसेनी गाणं म्हणजे शंभर टक्के स्वच्छ “शास्त्र” आणि ते ही यमा-नियमांचा नुसता रवंथ नव्हे तर, शास्त्राच्या चौकटीला धरून भला मोठ्ठा महाल उभा केल्यासारखं! अनेक रेकॉर्डिंग्स आणि व्हिडिओ यांच्या स्वरूपात भीमसेन सतत आपल्यासोबत राहणार आहेतच. जशी पंडितजीच्या आवाजाची चव नेहमीच मनात रेंगाळते तशीच […]

हिंदी चित्रपट सृष्टीतील छम्मा-छम्मा गर्ल उर्मिला मातोंडकर

हिंदी चित्रपट सृष्टीतील छम्मा-छम्मा गर्ल उर्मिला मातोंडकरचा जन्म ४ फेब्रुवारी १९७४ रोजी झाला. “मासूम’ चित्रपटातील “लकडी की काठी… काठी पे घोडा’ गाण्यावर नाचणारी छोटी ऊर्मिला मातोंडकर आठवत असेलच. लहान भावांबरोबर नाचतानाचे तेव्हाचे तिचे चेहऱ्यावरील निरागस भाव आजही नजरेसमोरून तरळतात. आजही उर्मिलाला अनेक जण “मासूम’ मधली घोडावाली मुलगी म्हणून ओळखतात. मराठी कुटुंबात जन्मलेल्या उर्मिला मातोंडकरने १९८० साली कलयुग नावाच्या […]

कोशकार, लोकसाहित्याचे अभ्यासक, संग्राहक व संपादक चितामण गणेश कर्वे

चितामण गणेश कर्वे यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल पुणे मध्ये तर उच्चशिक्षण फर्ग्युसन कॉलेजात झाले. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १८९४ रोजी झाला. गणित विषय घेऊन मुंबई विद्यापीठात त्यांनी बी. ए. पदवी मिळविली. १९१९ साली डॉ. केतकर यांच्या ज्ञानकोश प्रकल्पात ते काम करू लागले. डॉ. केतकरांसारख्या चतुरस्र, विद्वान, बुद्धिवंतांच्या सहवासात कोश संपादनाचे पहिले धडे कर्वे यांनी गिरविले आणि […]

कवयित्री आणि बालसाहित्यकार डॉ. लीला गणेश दीक्षित

त्यांच्या पुस्तकांमध्ये कोकणातील निसर्ग केंद्रस्थानी होता. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३५ रोजी गुहागरमध्ये झाला. पुण्यातील एसएनडीटी महाविद्यालयातून मराठीच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केले होते. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या त्या माजी अध्यक्षा आणि गेली सुमारे वीस वर्षे विश्वस्त म्हणून काम पाहात होत्या. डॉ. दीक्षित यांनी ‘प्राचीन मराठी वाङ्मयातून दिसणारे स्त्री दर्शन’ या विषयावर पीएचडी प्राप्त केली होती. त्यांना चार […]

पं. बिरजू महाराज

महान कथक गुरू, उत्कृष्ट गायक, निष्णात तबला, सरोद, व्हायोलिन वादक आणि उत्तम दर्जाचे चित्रकार असणाऱ्या पं. बिरजू महाराज यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी झाला. पं बिरजू महाराज यांचे वडील म्हणजे लखनौच्या प्रसिद्ध कालका-बिंदादीन घराण्यातील अच्छन महाराज.  त्याचे नाव खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा. बिरजू हे त्यांचे लहानपणचे नाव. आज आपण त्यांना आजही पंडित बिरजू महाराज म्हणून ओळखतो. पं.बिरजू […]

जागतिक कर्करोग दिवस

जगभरात ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आजारांच्या यादीत कर्करोग महत्त्वाचा आजार म्हणून समोर येत आहे. भारतात, कुठल्याही घडीला २५ लाख कर्करोगपीडित रुग्ण आढळतात, त्यात दरवर्षी आठ-नऊ लाख नवीन रुग्णांचे निदान होते. एका अहवालानुसार बालकांमध्ये कर्करोगाच्या प्रमाणात दरवर्षी मोठी वाढ होत आहे. कर्करोग हा एकच […]

आहे मनोहर तरी.. – (भाग पहिला)

भाजपच्या चौखूर उधळलेल्या वारूला खीळ बसली ती नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश आणि राजस्थानसहीतच्या पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकालांनी. ह्या हिंदी पट्ट्यात झालेल्या निवडणुकांत तीन राज्यांमध्ये भाजपने सत्ता गमावली. भाजपच्या या राज्यांतील पराभंवामागे त्या त्या राज्य सरकारांचा कारभार, अँटी इनकॅबन्सी इत्यादी काही कारणांप्रमाणे मतदारांनी ‘नोटां’चा केलेला प्रभावी वापर हे देखील एक कारण आहे. […]

भारताचे दहावे राष्ट्रपती के.आर. नारायणन

के.आर. नारायणन हे राष्ट्रपतीपदावर विराजमान होणारे जन्माने दलित असणारे पहीले भारतीय नागरीक असले तरीही ते समस्त भारतीयांचे नेते अशीच त्यांची प्रतिमा होती, त्यातच त्यांचे मोठेपण होते. राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी आतापर्यंत केवळ समारंभाचे मानद पद म्हणजे राष्ट्रपती ही ओळख पुसून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला. […]

1 192 193 194 195 196 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..