नवीन लेखन...

तू असा, तू कसा,

तू असा, तू कसा, कोसळता धबधबा जसा, अखंड जलप्रवाहाची जादू, ओघ खळाळता जसा,—!!! तू असा, तू कसा, वावटळीचे वादळ जसा, दाही दिशांना कवेत घेऊ, पाहणारे थैमान’च जसा, तू असा, तू कसा, भडकता ज्वालामुखी संतापाचा डोंह उसळता, आगीचा डोंब जसा,–!!! तू असा, तू कसा, दरीइतका खोल जसा, आंत आंत डोकावता, गहिरा गहिरा गूढ जसा, तू असा, तू […]

मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट

स्थापना : ४ फेब्रुवारी १७६८ भारतात अडीचशे वर्ष पूर्ण झालेल्या अगदी मोजक्या रेजिमेंट आहेत. त्यातली ‘मराठा लाइट इन्फंट्री’ ही एक अत्यंत मानाची रेजिमेंट आहे. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट (एम.एल.आय.आर.) ही भारतीय सेनेतील सैन्यदल असून सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील जंगी पलटण म्हणून होती. १८०२ च्या सुमारास याला रेजमेंटचा दर्जा देण्यात आला. […]

महात्मा गांधी यांना अनावृत्त पत्र

आदरणीय महात्माजी,  विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ जगतवंद्य विभूती आपणांस मानले जाते. विलक्षण निर्भयता, नम्रता, कमालीची साधी राहणी, दीन-दलितांविषयी अथांग करुणा आणि शोषितांबद्दल सहानुभूती या गुणांचा संगम आपल्या ठिकाणी होता. तत्वज्ञान ही जीवनाबरोबर विकसीत होणारी गोष्ट आहे, हे आपल्या बाबतीत खरे आहे. नैतिकता हेच संस्कृतीचे अधिष्ठान, संयम व त्याग हाच तिचा आत्मा. सुखोपयोगी साधने वाढविण्याची संस्कृती सध्या निर्माण होत आहे. श्रमप्रतिष्ठेची पीछेहाट होत आहे. […]

यातना आणि वेदना

यातना आणि वेदना, जीवन दुसरे असते काय, भोग आणि उपभोग, असे त्याचे दोन पाय ,,–!!! स्वार्थ अन् भांडण, हेच त्याचे अवयव, कधीकधी फक्त कींव, कधीकधी चांगुलपण, ,–!!! दया करुणा उपकार, सारेच जीवन विसरले, म्हणूनच आज सगळ्यांना, जीव न-कोसे करणारे,–!!! समस्या अडचणी यांचा, त्याभोवती घेराव , कसे कुणाला ठाऊक, करेल कधी संपूर्ण पाडांव,–!!! असेना का तरीही, त्यातच […]

बांगलादेशातील अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देण्याची गरज

बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील गैर-मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व देण्याच्या उद्देशाने मांडण्यात आलेले नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक २०१९, लोकसभेत मंजुर करण्यात आले आहे. या विधेयकावरून लोकसभेत विरोधकांनी गदारोळ केला. मात्र, तरीही ते अखेर मंजूर झाले आहे. […]

शोधूं कोठें त्यास ?

शोधत होतो रुप प्रभूचे,   एक चित्त लावूनी  । अवंती भवंती नजर फिरवी,   श्वास रोखूनी  ।।१।। शांत झाले चंचल चित्त,   शांत झाला श्वास  । ह्रदयनाडी मंद होऊनी,   चाले सावकाश  ।। २।। पचन शक्ती  हलकी झाली,   जठराग्नीची  । शिथील झाली गात्रे सारी,   देह चैतन्याची  ।।३।। देहक्रियांतील प्राणबिंदू ,  असे ईश्वर  । समरस होतां त्याच शक्तिशीं,   होई स्थिर  ।। […]

Hot & Glamorous – नेहा पेंडसे

ग्लॅमर आणि फॅशनची उत्तम समज फार थोडय़ा कलाकारांना असते. नेहा पेंडसेचे नाव यामध्ये सर्वात वर घ्यावे लागेल. मराठी इंडस्ट्रीत ग्लॅमर कॅरी करता येईल अशा मोजक्या अभिनेत्री आहेत. कॉस्च्यूमचा योग्य सेन्स असणं आणि ते तितक्याच सहजपणे कॅरी करणं हे इंडस्ट्रीतल्या फार मोजक्या कलाकारांना जमलं आहे. या कलाकारांच्या यादीतलं नेहा पेंडसे हे वरच्या यादीतलं नाव. ग्लॅमरस नेहा पेंडसेचं […]

वसंत सरवटे

मराठी साहित्यातील अनेक सा​हित्यकृतींना आपल्या चित्रांनी अधिक देखणेपण देणाऱ्या वसंत सरवटे यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९२७ रोजी झाला. वसंत सरवटे यांचा जन्म कोल्हापूरचा. त्यांचे शालेय आणि सुरुवातीचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरलाच झाले. त्यांना शाळेमध्ये असल्यापासून चित्र काढण्याची आवड होती. हस्तलिखितांमध्ये कविता, कथांसाठी चित्रे काढायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यातूनच पुढे त्यांची कारकीर्द घडली. पु.ल. देशपांडे, जयवंत दळवी, रमेश मंत्री […]

हिंदी सिनेसृष्टीतील जेष्ठ कलाकार वहिदा रेहमान

गाईड, प्यासा, चौदहवीं का चाँद, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम, तीसरी कसम यांसारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमांसाठी वहिदा रेहमान यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९३६ रोजी तामिळनाडूतील चेंगलपेट येथे झाला. वहिदा रेहमान यांना डॉक्टर बनण्याची इच्छा होती. मात्र नशीबाने त्या बॉलिवूडमध्ये आल्या. वहीदा रहमान यांनी आपल्या बहिणीसोबत भरतनाट्यमचे धडे गुरु त्रीचुंबर मिनाक्षी सुंदरम पिल्लई […]

कोंजीवरम नटराजन अण्णादुराई

द्रमुकचे संस्थापक, तमिळनाडूचे राजकारणी व मुख्यमंत्री सी.एन. अण्णादुराई तथा कोंजीवरम नटराजन अण्णादुराई यांचा जन्म १५ सप्टेंबर १९०९ रोजी झाला. तमिळ भाषेतील एक निष्णात लेखक असलेले अण्णादुराई आपल्या भाषणशैलीसाठी देखील प्रसिद्ध होते. पेशाने प्रथम शाळा शिक्षक व नंतर पत्रकार असलेल्या अण्णादुराईंचा पेरियार ह्या द्रविडी चळवळकर्त्या नेत्यास पूर्ण पाठिंबा होता. अण्णादुराईंनी १९३७ साली पेरियारच्या द्रविडर कळघम ह्या पक्षामध्ये प्रवेश केला. […]

1 193 194 195 196 197 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..