नवीन लेखन...

१ फेब्रुवारी १८८३ ला ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ति प्रकाशित

‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ कडून प्रकाशित केला जाणारा हा इंग्रजी भाषेतील शब्दकोश आहे. १८५७ साली इंग्लंडमध्ये ‘फायलॉजिकल सोसायटी’च्या काही अर्ध्वयूंना तेव्हा उपलब्ध असलेले सारेच शब्दकोश अपुरे आहेत, असे वाटू लागले आणि त्यातून ‘ऑक्सफर्ड’ या सुप्रतिष्ठित शब्दकोशाचा जन्म झाला. १८८४ मध्ये ‘A New English Dictionary on Historical Principles’ या नावाने पहिल्यांदा हा शब्दकोश प्रकाशित झाला. १८९५ मध्ये सर्वप्रथम […]

दर्जेदार काव्य रचना करणारे कवि राजा बढे

कळीदार कपूरी पान’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ अशा दर्जेदार काव्य रचना करणारे कवि राजा बढे यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला. राजा बढे हे नावाप्रमाणंच राजा-माणूस होते. राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी… रुबाबदार,प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी, पण मनात देशभक्तीचा स्फुलिग सांभाळणारा राष्ट्रप्रेमी […]

`कालनिर्णय’ दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेले जयंत साळगावकर

जयंत साळगावकरांनी ज्योतिष, पंचांग आणि धर्मशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९२९ रोजी मालवण येथे झाला. मॅट्रिकपर्यंत संस्कृतचे परंपरागत शिक्षण घेतलेल्या साळगांवकरांनी पंचांग आणि दिनदर्शिका यांचा उत्तम मेळ घालून `कालनिर्णय’ ही नऊ भाषांतून प्रसिद्ध होणारी दिनदर्शिका म्हणून ख्याती मिळविली. जयंत साळगावकर हे सर्वाधिक खपाच्या `कालनिर्णय` या दिनदर्शिकेचे संस्थापक आहेत. `कालनिर्णय’ आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँड म्हणूनही प्रस्थापित करण्यात […]

भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला कल्पना चावला

कल्पना चावला या भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर होत्या. पूर्ण नाव कल्पना बनारसीलाल चावला. त्यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी कर्नाल, हरयाणा येथे झाला. त्यांचे कुटुंब हे एक मध्यमवर्गीय भारतीय कुटुंब होते. मुलींच्या तुलनेत मुलांना अधिक महत्त्व अशलेल्या समाजात लहानाची मोठी झाली तरही कल्पना यांनी आईच्या मदतीने नेहमी तिच्या स्वप्नांच्या दिशेने मार्गक्रमण केले .कल्पना यांनी शालेय शिक्षण कर्नाल येथे, तर […]

रुद्रा – कादंबरी – भाग १

या गोष्टीची सुरवात गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी झाली होती. ‘लैला’नावाचे एक ठिकाण आहे. त्याच्या खालच्या मजल्यावर हुक्का पार्लर आणि त्या वरच्या मजल्यावर बार आणि रेस्टोरंट आहे. नावाने हुडकायला गेलात तर सापडणार नाही. कारण त्याचा कोठेही साइन बोर्ड नाही. पण माहितगारांना असल्या गोष्टींची अडचण पडत नाही! रुद्राचे हे नेहमीचे ‘विरंगुळ्याचे ‘ठिकाण. […]

गवाक्ष

जीवनप्रवाहात खूप काही मागे सुटतं. पूढे पूढे चालतांना जरी वाट दिसत असली तरी नियती चा मोठ्ठा धोंडा आला की प्रवाह भरकटतो. आणी जे हवंय ते मागे ,खूप मागे सुटून जातं. पण सतत प्रवाहीत असणे हा निसर्ग नियम पाळायलाच हवा. नाहीतर थांबला तो संपला या वाक्याप्रमाणे अनपेक्षित पणे मनातील गवाक्षाने शोधलेलं पदरात पडलेलं चांदणं वेचता आलंच नसतं. […]

जागतिक बँक स्थापना दिवस

जागतिक बँक (World Bank) ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. ब्रेटन वुडस् पद्धती समितीच्या जागतिक आर्थिक नियंत्रण शिफारशीं वापरण्यात आल्या होत्या. या समिती मध्ये ४५ मित्रराष्ट्रे होती. विकसनशील देश व विकसनशील देश यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे. या बॅंकेने पहिले कर्ज फ्रांस या देशाला दिले. […]

शारदेस विनंती

हे शारदे ! रूसलीस कां तू,  माझ्या वरती  । लोप पावली कोठे माझी,  काव्याची स्फूर्ती  ।। दिनरात्रीं तव सेवा केली,  मनोभावें  । कळले नाहीं आज शब्द ओठचे,  कोठे जावे  ।। दिसत होते भाव मजला,  साऱ्या वस्तूमध्यें  । उचंबळूनी जाई मन तेव्हां,  नाचत आनंदे  ।। तेच चांदणे तारे गगनी,  आणिक लता वेली  । पकड येईना टिपण्या सौंदर्य, […]

रंगछटा

प्रश्न नेहमीच सोपे असतात. अवघड असतं ते उत्तर. इतरांना द्यायच्या उत्तरापेक्षा मनाला देण्याचं उत्तर जास्त अवघड!कारण सगळचं त्यातल्या मूळ रंगछटासह स्पष्ट आपल्या मनात असतं. पण तरिही […]

मराठीतील दर्जेदार नाटकांचे लेखक वसंत कानेटकर

महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं नाट्यक्षेत्रातील एक नाव म्हणजे वसंत कानेटकर. वसंत कानेटकर यांचे शिक्षण पुणे व सांगली येथे झाले. त्यांचा जन्म २० मार्च १९२२ रोजी झाला. इंग्रजी विषय घेऊन एम. ए. पदवी मिळविल्यानंतर नाशिक येथे हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालयात सुमारे २५ वर्षे त्यांनी अध्यापन केले. नाटककार म्हणून ओळख असलेल्या कानेटकरांनी सुरुवातीला कथा, कादंबरीपासूनच आपल्या लेखनाला सुरुवात केली. […]

1 196 197 198 199 200 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..