नवीन लेखन...

आगरातला बळी राजा

देशावर किंवा घाटावर जशा एकेक शेतकऱ्याच्या 20 एकर 50 एकर जमिनी असतात तशा आमच्या ठाणे जिल्ह्यात फारशा लोकांच्या नाहीत. आता कोणी राजकारणी लोकांनी घेतल्यात शेकडो एकर पण आम्हा सर्वसाधारण आगरी शेतकऱ्यांच्या जमिनी या जेमतेम चार एकर पासून जास्तीत जास्त आठ ते दहा एकर पर्यंतच. आता आमच्या पिढीच्या वाटणीला एखादा एकर आली तरी खूप जमीन आहे असे वाटावे. […]

मुखपुस्तिका उर्फ फेसबुक एक्सप्रेस

या मुखपुस्तिका उर्फ फेसबुक एक्सप्रेसमुळेच कित्येक नवीन लेखक, कवी जन्माला आले, माहितीचा प्रसार त्वरित होऊ लागला, निवृत्त आणि एकाकी जेष्ठ नागरिक आणि गृहिणींना हक्काचा विरंगुळा मिळाला, नवनवीन तंत्रज्ञानाशी तोंडओळख होते, वगैरे वगैरे.. […]

उगवलेला दिवस

उगवलेला दिवस सावलीसह सरकतो जगंलात गेली गुरढोर रस्ता घराचा धुंडतो ओढ लागुन पिल्याची चिमणी ही परतते काटा रूतयो पायी तरी अलगद असा काढते गाय हंबरते मनात दुधाचा ओवा पान्हावते थांब रे बाला थोडं लवकरच मी पोहोचते पावले झपाझप पडती घराच्या लागल्या ओढीन दिस गेला दुराव्याचा हाक दिली लेकरानं — शरद शहारे

ज्येष्ठ मराठी लेखक आनंद यादव

अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या आनंद यादव यांनी साहित्य क्षेत्रात कादंबरीकार अशी स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. त्यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ रोजी कोल्हापूर येथे झाला. झोंबी, घरभिंती हय़ा त्यांच्या कादंबऱया वाचकप्रिय ठरल्या होत्या. त्यांच्या झोंबी या कादंबरीला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्य प्रकारातही […]

सईचा अनोखा चॉकलेट रॅपर चा संग्रह

खाऊन झाल्यावर कचरा म्हणून फेकून देण्यात येणारया देशी विदेशी  चॉकलेट रॅपरचा अनोखा संग्रह  तुमसर जि भंडारा येथील सई जगदीश फाले या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी केला असुन तिचा संग्रह बालपणाच्या आठवणी ताज्या करणारा ठरला आहे.  […]

निरंजन – भाग ६ – ग्रहण भक्ती

मनाची ग्रहणशक्ती वाढवण्यासाठी ध्यान करणे खुप गरजेचे आहे. ध्यान करुनच मनाची ग्रहणभक्ती वाढते आणि ग्रहण भक्तीतुनच ग्रहण शक्ती प्राप्त होते. ग्रहणभक्ती वाढवण्यासाठी ग्रहणभक्तीध्यान खुप महत्वाचे आहे. […]

दिवाळी ऑनबोर्ड

माझे पहिले जहाज ब्राझिलच्या किनारपट्टीवर आणि अमेझॉन नदीमध्ये असलेल्या पोर्ट मध्ये ये जा करायचे. ब्राझिलच्या सागरी हद्दीत तीन महिन्यांपेक्षा जास्त वेळ जहाज थांबू शकत नसे कारण तसे केल्यास जहाजाला ब्राझिल मध्ये स्थानिक जहाज म्हणून रजिस्टर करावे लागले असते. तीन महिने पूर्ण व्हायच्या आत जहाज जर ब्राझिलच्या दक्षिण भागात असेल तर खाली उरुग्वे मध्ये जवळच्याच मॉन्टेविडियो या […]

झुंज !

जर तुम्हाला त्यांच्या स्वप्नात जाण्याची परवानगी असती तर, भास्करराव चिकाटीने त्या वाघाशी झुंज देताना दिसले असते! कोणी तरी मदतीला येई पर्यंत त्यांना त्या जनावराला थोपवणे भागच आहे!! […]

तव्यावर झुणका अन् मणक्यावर दणका

बायकोनी बाहेरुन आल्यावर फक्त गरमागरम बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी करुन दोघांनी झुणका भाकरीचा आस्वाद घ्यायचा अस सरप्राइज पँकेज होत. बायको वेळेवर आली, भाकरी केल्या आणि माझ्या आयुष्यातील किचनमधील पहिल्या वहिल्या आविष्काराच्या सांगतेची घटिका समीप आली. […]

1 18 19 20 21 22 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..