विश्वासराव पेशवे
विश्वासराव पेशवे हे नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव. त्यांचा जन्म २ मार्च १७४२ रोजी झाला. नानासाहेब व गोपिकाबाई यांचा पुत्र विश्वासराव पेशवे हे सर्व पेशव्यांत फार सुंदर होते. हे लहानपणापासून राज्यकारभारांत पडला होता व युध्दाच्या मोहिमांवरहि जात असे. निजामावरील सिंदखेडच्या स्वारींत विश्वासराव यांना मुख्य सरदार करून दत्ताजी शिंद्यास याचा कारभारी नेमलें होतें. विश्वासराव व जनकोजी जवळ जवळ सारख्याच वयाचे असल्यानें त्यांच्यांत […]