2019
एक आठवण ..स्वरभास्कराची…
पु. ल. देशपांडे यांनी पंडित भीमसेन जोशी यांची आकाशवाणीवर मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा हा संपादित भाग… मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी…
[…]
लेखिका, दिग्दर्शिका सुमित्रा भावे
सुमित्रा भावे या माहेरच्या सुमित्रा उमराणी. सुमित्रा भावे या मुळच्या पुण्याच्या. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९४३ रोजी पुणे येथे झाला. आगरकर हायस्कुलमधुन त्यांनी माध्यमिक शिक्षण तर फर्ग्युसन महाविद्यालयातुन त्यांनी कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबईच्या टाटा समाजविज्ञान संस्थेतुन समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. कविता लेखन, रांगोळी, चित्रकला असे छंद जोपासत त्यांनी विद्यार्थी दशेत गुरु रोहिणी भाटे यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेतले. […]
जेष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर
जेष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३० गोव्यातील माशेल येथे झाला. मोहनदास सुखटणकर यांचे पणजोबा, आजोबा आणि वडील हे त्या काळातील प्रख्यात वैद्य. मोहनदास यांचे प्राथमिक आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण माशेल आणि म्हापसा येथे झाले. म्हापशाच्या ‘सारस्वत विद्यालय’ या मराठी शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असताना त्यांनी पहिल्यांदाच एका छोटया नाटुकलीत काम केले. त्या नाटुकलीचे नाव होते, ‘खोडकर […]
युवा दिवस
भारत सरकारने १९८५ मध्ये १२ जानेवारी या दिवसाला ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करायचे ठरवले. या दिवसाला असं काय महत्व आहे? तर हा दिवस म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती. ” उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही” हा संदेश मा.स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना दिला. स्वामी विवेकानंद म्हणजे योद्धा, संन्यासी, आणि […]
अष्टपैलू संगीतकार सी. रामचंद्र
सी. रामचंद्र यांचे पूर्ण नाव रामचंद्र चितळीकर, ‘सी. रामचंद्र’ हे नाव त्यांनी सिने दिग्दर्शक जयंत देसाई ह्यांच्या सूचनेवरुन धारण केले. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९१८ रोजी झाला. आपल्या निकटवर्तीय व आप्तेइष्टांमध्ये ते ‘अण्णा’ या नावाने प्रसिद्घ होते. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीस होते. त्यामुळे त्यांच्या वडिलांची ठिकठिकाणी बदली होत.त्यांचे बालपण डोंगरगड, नागपूर, विलासपूर, गोंदिया अशा निरनिराळ्या ठिकाणी गेले. शालेय शिक्षणात […]
मला भावलेला युरोप – भाग ८
‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो’असे आपण नेहमी म्हणतो. त्या प्रमाणे प्रत्येक टूरच्या यशामागे टूर लीडरचा सहभाग फार महत्त्वाचा, असे म्हणावेसे वाटते. आपली टूर कशा प्रकारे पार पडली आणि आपण त्यातून किती आनंद मिळवला, हे सर्वस्वी आपल्याला लाभलेल्या टूर लिडरवर खूपसे अवलंबून असते .असे माझे वैयक्तिक मत. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण टूर करणार असू , तर […]
जेष्ठ रंगकर्मी गोपीनाथ सावकार
गोपीनाथ सावकार यांनी संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात मराठी रंगभूमीवर सातत्याने संगीत नाटकं सादर केली. ‘भावबंधन’, ‘शाकुंतल’, ‘सुवर्णतुला’, ‘ययाती देवयानी’ अशा अनेक संगीत नाटकांचे दजेर्दार प्रयोग सादर करून त्यांनी संगीत नाटकाचा प्रेक्षक टिकवून ठेवायचा जवळ जवळ एकहाती प्रयत्न केला. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९१० रोजी झाला. ‘संगीत ययाती आणि देवयानी’ हे नाटक गोपीनाथ सावकार यांनी त्यांच्या ‘कलामंदिर’ या नाटय़संस्थेतर्फे २० ऑगस्ट […]
गायक महेश काळे
शास्त्रीय संगीताच्या रसिकांसाठी महेश काळे हे सुपरिचित नाव. ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाण्यांमुळं हे नाव सर्वदूर पोहोचलं. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९७६ रोजी झाला. विशेषत: तरुणाईच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखलं जाऊ लागलं. महेशच्या गाण्याने लोकांना वेड लावलेलं आहे. कुठल्याही प्रकारांतलं गाणं असो, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावगीत, गजल, कव्वाली किंवा एखादं पाश्चिमात्य गाणे प्रत्येक प्रकार संपूर्ण ताकदीने, तो ऊर्जेने […]
देवरुख मधील ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक वसंत उर्फ बाळासाहेब पित्रे
बाळासाहेब पित्रे आणि देवरूख हे समीकरणच गेल्या अनेक वर्षात निर्माण झाले होते. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९२८ रोजी झाला. वसंत मनोहर उर्फ बाळासाहेब पित्रे यांनी हिंदुस्थान लिव्हर, टाटा यांच्या सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये आधी मानव संसाधन क्षेत्रात ज्येष्ठ पदावर काम केले होते. देवरुख येथील जगप्रसिद्ध सुश्रुत-अॅडलर या ओर्थोपेडिक शल्य चिकित्सा उपकरणे तयार करणाऱ्या नामांकित कंपनीचे ते संस्थापक संचालक होते. बाळासाहेब […]