नवीन लेखन...

प्रेमकथा : पूर्वीच्या आणि आजच्या 

प्रेमकथेमुळे भारतीय चित्रपट सृष्टीला कधीच मरण नाही. पूर्वीच्या चित्रपटातील प्रेमकथेला दर्दभरा साज होता. असंख्यांना भुरळ घालणार्‍या प्रेमकथांनी सामाजिक जीवनावर अधिपत्य गाजवायला सुरुवात केली आहे. आजच्या चित्रपटातील प्रेमकथा पाहून खर्‍या जीवनात त्यांना प्रत्यक्षात आणणे, एवढेच सामान्य ध्येय उराशी बाळगून जगतायेत आजचे तरुण.   […]

स्वप्न आणि जागेपण

एक ती झोप     स्वप्न बघत राही शिणवून शरीर ताप   जीवास सुख देई स्वप्न जाई विसरुन    जाग येता मनां जागे मन   स्वप्नांत भासवी वेगळेपणा एकाच मनाच्या दिसे   ह्या दोन भुमिका भिन्नता त्यांत भासे     जाऊन दोन टोकां स्वप्न आणि जागेपण   देहाच्या दोन स्थिती नाण्याच्या बाजू दोन  एकमेका न मिळती डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmain.com  

हात दाखवून अवलक्षण?

यंदाच्या यवतमाळात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नामवंत कवयित्री अरुणा ढेरे यांची बिनविरोध  निवड झाल्यामुळे मराठी संमेलनाला लागलेला वादाचा शाप यावेळी पुसला जाणार, असे वाटत असतानाच उद्घाटकांच्या निमंत्रणावरून संमेलनाच्या सहा दिवस आधी निर्माण झालेल्या वादाने सगळ्या उत्साहावर पाणी फिरवले आहे. […]

काळजी नसावी

या एका दोन शब्दी वाक्याचा प्रत्येकाने वापर केला तर किती मानसिक आधार मिळतो. हे ज्याला खरंच मानसिक आधार हवा आहे, त्या व्यक्तीपेक्षा कोण चांगलं समजू शकेल? […]

बालकुमार -कथा – मोन्या

आपल्याला मित्र असणे कित्ती छान असते नाही का ? मित्राबरोबर खूप गप्पा मारता येतात,खेळता येते आणि खेळता खेळता भांडता सुद्धा येते, मित्रशिवाय आपल्याला करमत नसते हे तितकेच खरे. […]

कविता – कोण असेल ती …!

काळे दाट रेशमी कुंतले पाहिले ज्यांनी ते गुंतले कोण असेल रे ती ? दिसते छान सुंदर किती सुंदर डोळे नजर बोलकी गाली खळया गोड खुलती डौलदार चालतांना टाकते पावले एका लयीत ती कोण असेल रे ती ? दिसते छान सुंदर किती पाहाण्या मन भरूनी तिला किती बहाणे करीती वेडे ते डोळ्यासमोरूनी जाई जेंव्हा नजरेचे त्यांच्या पारणे […]

विश्रब्ध

रेशीम धागा जेवढा ओढावा तेवढा तो गुतंतो मनातील विकल्पाचेही तसेच आहे जितकी ओढाताण तितकी गुंतागुंत मनातील विकल्प काव्यलेखन करतांना सहजपणे उमटतात. तसं तर काव्यलेखन ही मधूर समाधी आहे. काही क्षणासाठी का होईना पण जीवनातली सारी दुःखे ,दुःखाच्या सा-या जखमा आणी जखमांच्या सा-या वेदना विसरायला लावणारी ती एक प्रभावी शक्ती आहे. सुदैवाने तू त्या शक्तीशी परिचीत आहेस. […]

वर्षाचे भगिनी प्रेम

तप्त होतां धरणी माता, शांत करी वर्षा तिजला प्रफुल्लतेचे झरे फुटती,   आंतूनी त्या मातीला…..१, जलमय होती नदी नाले,  दुथडी भरूनी वाहती धबधब्यातील खरी शोभा,  वर्षामुळेंच दिसती…२, हिरव्या रंगीं शाल पसरते,  धरणी माते वरी ऊब यावी म्हणून मेघांचे,  आच्छादन ती करी….३, वर्षा धरती बहिणी असूनी,  प्रभूची भावंडे उचंबळूनी प्रेम येतां,  धावून येते तिजकडे….७ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

ज्येष्ठ गायक, संगीतज्ञ आणि लेखक पं.सत्यशील देशपांडे

शास्त्रीय संगीतात आपल्या अनोख्या आणि स्वयंभू गायकीने उच्चस्थान निर्माण करणारे पं. कुमार गंधर्व हे पं.सत्यशील देशपांडे यांचे गुरू! लहान मुले खेळताना भिंतीआडून डोकावणाऱ्या एखाद्या भिडूला ज्या सहजतेने आपल्या खेळात समाविष्ट करून घेतात, तेवढय़ाच सहजतेने एखाद्या रागातील एखाद्या वज्र्य स्वराला हळूवार कुरवाळणाऱ्या पं. कुमार गंधर्व यांची संगीताकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी आणि उदात्त होती. त्यांचा जन्म ९ जानेवारी […]

1 208 209 210 211 212 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..