लेखिका आणि स्तंभलेखक शोभा डे
मूळच्या शोभा राजाध्यक्ष. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९४८ रोजी झाला. त्यांचे वडील डिस्ट्रिक्ट जज होते. शोभा डे यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून त्यांनी मानसशास्त्रात पदवी घेतली. तरूण वयात मॉडेल म्हणून मोठे नाव कमावल्यानंतर त्यांनी १९७० मध्ये पत्रकारिता सुरु केली. त्यांचे पती दिलीप डे. पेज थ्री कल्चर अशी ओळख असलेल्या संपन्न भारतीयांच्या सांस्कृतिक- सामाजिक जीवनाशीच त्या आयुष्यभर प्रामुख्याने निगडित राहिल्याने […]