श्रीमत् आदिशंकराचार्यांचे श्रीकृष्णाष्टकम् – मराठी अर्थासह
जगद्गुरू आदि शंकराचार्यांची सर्वच स्तोत्रे रसाळ व अर्थगर्भ आहेत. प्रस्तुत कृष्णाष्टक प्रामुख्याने बालकृष्णाच्या स्तुतिपर आहे. अत्यंत्त सोप्या तरीही तरल व प्रवाही अनुप्रासयुक्त अशा या स्तोत्राची गेयता वेगेवेगळ्या शब्दसमूहांच्या योजनेतून द्विगुणित होते. कठोर उच्चाराची अक्षरे त्यात क्वचितच असल्याने त्याची कोमलता अधिकच प्रत्ययास येते. डोळे मिटून चालीवर ते गायल्यास बालकृष्णाची प्रतिमा समोर उभी राहिल्याशिवाय रहाणार नाही. […]