नवीन लेखन...

संगीतकार, संयोजक, वादक अरुण पौडवाल

एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मराठी-हिंदी सिनेजगतात आपली छाप सोडणारे संगीतकार अनिल-अरुण अर्थात अनिल मोहिले व अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेल्या बहारदार गीतांचे गारूड आजही रसिकांच्या मनावर आहे. मराठीतले शंकर-जयकिशन अशी ओळख असणाऱ्या या संगीतकार जोडीची कारकीर्द विलक्षण गाजली. […]

ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर

शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. नाटकाप्रमाणे चित्रपटातदेखील शरद तळवलकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, तुळस तुझ्या अंगणी, रंगल्या रात्री अशा अखेर जमलं, वाट चुकलेले नवरे, बायको माहेरी जाते, मुंबईचा जावई आणि एकटी अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. […]

ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव

केवळ गीतकार आणि संगीतकार एवढेच ‘शब्दप्रधान गायकी’चे पुरस्कर्ते यशवंत देवांचे कर्तृत्व नाही. ते उत्तम संगीत शिक्षक व संगीत संयोजक होते, काव्याचे डोळस अभ्यासक होते. चित्रपटांप्रमाणेच नाट्यक्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षणीय आहे. चाळीसहून अधिक नाटकांसाठी त्यांनी गीत, संगीत, पार्श्वसंगीत देण्याची जबाबदारी सांभाळली आहे. […]

सुप्रसिद्ध लेखिका योगिनी जोगळेकर

गायिका, कवयित्री, नाटककार व सुप्रसिद्ध लेखिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म ६ ऑगस्ट १९२५ रोजी पुणे येथे झाला. योगिनी जोगळेकर यांनी बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर १९४८ ते १९५३ या काळात त्यांनी शिक्षिका म्हणून नोकरी केली. तसेच ‘राष्ट्रसेविका समिती’च्या माध्यामातून त्यांनी अनेक वर्ष सामाजिक कार्यही केले. याच काळात त्यांनी विविध कथा, कादंबरीतून स्त्रीविषयक लेखन केले. त्यांचे काही काव्यसंग्रह व […]

राष्ट्रीय कीर्तन केसरी गोविंदस्वामी आफळे

बुवांच्या कीर्तनाला हजारोंनी गर्दी होई, रस्ते बंद होत. भावगीतांच्या काही रेकॉर्डसही त्यांच्या आवाजात निघाल्या. “सागरा प्राण तळमळला” हे सावरकर रचित गीत सर्वप्रथम HMV ने १९४८-४९ साली त्यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित केलेले आहे. विविध मासिकात, दैनिकात त्यांचे वेगवेगळ्या विषयांवर लेख प्रसिद्ध होत. १५ नाटके, २ कवितासंग्रह, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनकार्यावर आधारित “सावरकर गाथा” हे महाकाव्य त्यांनी रचले. त्याचे काव्यगायनाचे १०० प्रयोगही त्यांनी केले. संपूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेरची असंख्य गावं इतकच नव्हे तर अमेरिकेतही ते ३ महिने राहून कीर्तने गाजवून आले. […]

वर्ल्ड व्हेगन डे

दरवर्षी १ नोव्हेंबरला संपूर्ण जगभरामध्ये World Vegan Day साजरा करण्यात येतो. व्हेगन डायट म्हणजे प्राणिजन्य अन्नपदार्थांचा संपूर्ण त्याग. ही आहारशैली पाळणारे लोक दूध, तूप, अंडी हे पदार्थ देखील खाण्यास वर्ज्य मानतात. हे पदार्थ मिळवताना हिंसा होते असा त्यांचा सिद्धांत आहे. […]

ज्येष्ठ दिग्दर्शक रामचंद्र ठाकुर

रामचंद्र हे ठाकूर हिंदी आणि गुजराती चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक होते. रामचंद्र ठाकूर यांची खासियत ही होती की ते अकरा भाषा बोलणारे बहुभाषी होते. ते पाली भाषेचे अभ्यासक होते. […]

अजूनही प्रणयाचे ऐकू येते गुंजन !

अजूनही प्रणयाचे ऐकू येते गुंजन! हुळहुळते अधरांवर माझ्या पहिले चुंबन!! तुझा स्पर्श पहिल्यांदा झाला मला असा की, उभ्या हयातीचे या माझ्या झाले कंचन! गगनामध्ये अजून गर्दी नक्षत्रांची तुझ्या नि माझ्या प्रीतीला ती करती वंदन! सवे माझिया तू असली की, असे वाटते…. स्वर्गामधले अवतरले भवताली नंदन! श्वासाश्वासामधे चालते तुझीच घमघम अजून कुठले मला पाहिजे दुसरे रंजन! मला […]

पचास साल की आयु

पचास साल हुए जिंदगीके,  गोल्डन ज्युबली मनायी गयी हंगामा और जल्लोष मे,  पूरा दिन पूरी रात गयी सारे बच्चे और रिश्तेदार,  जमा हुए इकठ्ठा फिर पडोसवाले क्यूं रहेंगे पिच्छे,  जब खानेको था मिठा सबने तारिफ की पचास साल, जिंदगी के ऊपर हम तो बहूत खुष हुए सुनकर, उसे पहीली बार जीन जीन चिजोंको किसीने आजतक ना जाना […]

सुरां – सुरांचे गीत व्हावे

सुरां – सुरांचे गीत व्हावे, अर्थवाही शब्दातुनी, भावनांची गोड पखरण, मंजुळ तराणे नादातुनी,–!!! काळजाचा ठांव घेत असे, स्वाभाविक त्या गानातुनी, आलापातुनी अगदी अल्लद , स्वर्गीय गान निर्मितसे,–!!! शब्द होती जिवंत केवढे, संगीत वाहते निर्झरापरी, सुरेल बनत आरोह अवरोह, अंतिम ते हृदयस्पर्शी गाणे,–;!! सूर लागता भान हरपतसे डोहातून त्या तरंग उठती , स्वरमयी ती विलक्षण थरथर, अंतरातुनी […]

1 32 33 34 35 36 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..